फोटो सौजन्य: istock
बदलत्या वेळेनुसार अनेक ऑटो कंपन्यांनी नवनवीन टेक्नॉलॉजी बाजारात आणल्या आहेत. ज्यामुळे नक्कीच वाहन चालवणे अजून सोयीस्कर बनले आहेत. अशातच आज आपण अशा एका टेक्नॉलजीबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे टाटाच्या एका कारचे नशीब पालटले आहेत.
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने फ्युएल इकॉनॉमी शोधणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठे यश मिळवले आहे. कंपनीने FY 2025 मध्ये एकूण 1.39 लाख सीएनजी वाहनं विकली आहेत, जी गेल्या वर्षीपेक्षा 53% जास्त आहे. ही वाढ भारतातील सीएनजी वाहनांची वाढती मागणी आणि टाटाच्या धोरणात्मक नियोजनाचा परिणाम आहे. चला याची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
2024 मध्ये लाँच झालेल्या नेक्सॉन सीएनजीने टाटासाठी सीएनजी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. याशिवाय, टाटाने त्यांच्या दोन लोकप्रिय मॉडेल्स Tiago आणि Tigor सीएनजीमध्ये AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) पर्याय देखील जोडला, ज्यामुळे ही कार विशेषतः शहरी ग्राहकांमध्ये खूप पसंत केली जाते.
टाटाचे म्हणणे आहे की आता Tiago आणि Tigor च्या सीएनजी व्हेरियंटची मागणी पेट्रोल मॉडेल्सपेक्षा जास्त झाली आहे, जे दर्शवते की ग्राहक आता मायलेज आणि कॉस्ट या दोन्हींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत.
सर्व टाटा सीएनजी वाहनांना आता ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी स्टॅंडर्ड म्हणून मिळते. याचा अर्थ असा की आता बूट स्पेसवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होत नाही आणि ग्राहकांना इंधन कार्यक्षमतेसह स्पेसची काळजी करण्याची गरज नाही. या टेक्नॉलॉजीमुळे टाटा कंपनी मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या सीएनजी रेंजच्या बरोबरीने आला आहे, खरंतर, बॉडी स्टाईलच्या बाबतीत टाटाची रेंज अधिक वैविध्यपूर्ण बनली आहे.
सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असली तरी, हॅचबॅक आणि सेडान सेगमेंटमध्ये टाटाच्या विक्रीत 12% घट झाली आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की लवकरच अपडेट होणारी अल्ट्रोझ ही ट्रेंड बदलू शकेल.
केवळ टाटाच नाही तर मारुती सुझुकीसारख्या इतर उत्पादकांनीही कबूल केले आहे की भारतात लहान कारची मागणी कमी झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण एसयूव्ही सेगमेंटची प्रचंड लोकप्रियता आहे, जी आता प्रत्येक बजेट श्रेणीला व्यापत आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करणारे देखील आता थेट एसयूव्हीकडे वळत आहेत.