आपली गाडी इतरांपेक्षा वेगळी आणि सुंदर दिसावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी अनेक जण गाडीमध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन्स करतात. परंतु, भारतात मोटार वाहन गाड्यांमध्ये काहीही बदल करण्यावर कडक निर्बंध आहेत. चुकीच्या पद्धतीने केलेले बदल तुम्हाला मोठ्या कायदेशीर अडचणीत आणू शकतात. तरीही, कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही तुमच्या गाडीत कोणते बदल करू शकता, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे, १. कायदेशीर आणि परवानगी असलेले बदल तुम्ही तुमच्या गाड्यांमध्ये खालील बदल अधिकृतपणे करू शकता, ज्यासाठी पोलिसांकडून किंवा आरटीओकडून दंड आकारला जात नाही. गाडीचा रंग बदलणे: तुम्ही तुमच्या गाडीचा मूळ रंग बदलू शकता. परंतु, यासाठी तुम्हाला आधी आरटीओची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. नवीन रंगाची नोंद तुमच्या गाडीच्या आरसी बुक करणे बंधनकारक आहे. इंधन बदल (सीएनजी किंवा एलपीजी किट): जर तुम्हाला गाडीत सीएनजी किंवा एलपीजी किट बसवायचे असेल, तर ते सरकारी मान्यताप्राप्त केंद्रातूनच बसवून घ्यावे लागेल. या बदलाची नोंदही आरसी बुकवर करावी लागते. इंजिन बदलणे: जर गाडीचे इंजिन खराब झाले असेल, तर तुम्ही त्याच कंपनीचे आणि त्याच क्षमतेचे नवीन इंजिन बसवू शकता. मात्र, यासाठी आरटीओची पूर्वपरवानगी आणि नवीन इंजिन क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. Pratap Sarnaik : महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णय; परिवहन विभागाचे नवे निकष निश्चित टायर आणि चाके बदलणे: तुम्ही गाडीला कंपनीने दिलेल्या आकाराचेच नवीन चाके (अलॉय व्हील्स) बसवू शकता. टायरचा आकार कंपनीच्या नियमापेक्षा मोठा नसावा. छोटे अंतर्गत बदल: गाडीच्या आतमध्ये नवीन सीट कव्हर, नवीन म्युझिक सिस्टम किंवा अंतर्गत दिवे लावण्यास परवानगी आहे, ज्यामुळे गाडीच्या मूळ संरचनेला धोका पोहोचत नाही. २. कोणते बदल पूर्णपणे बेकायदेशीर आहेत? भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गाडीच्या मूळ रचनेशी किंवा सुरक्षेशी तडजोड करणारे बदल पूर्णपणे बेकायदेशीर आहेत: मोठ्या आवाजाचे सायलेन्सर: दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांमध्ये फॅन्सी आणि कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावणे हा गंभीर गुन्हा आहे. फॅन्सी नंबर प्लेट: नंबर प्लेटवर नावे, डिझाईन किंवा चुकीच्या फॉन्टचा वापर करणे बेकायदेशीर आहे. फक्त सरकारी मान्यताप्राप्त (एचएसआरपी) नंबर प्लेटच वैध आहे. काळ्या रंगाच्या काचा: गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास सक्त मनाई आहे. काचांमधून आतले स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. RTO Vehicle Sale Rules : बेकायदा वाहन विक्रीवर आता कडक कारवाई; केंद्र सरकारची नवी नियमावली लागू गाडीची उंची किंवा रुंदी बदलणे: गाडीचे चेसिस कापून ती मोठी करणे किंवा गाडीची उंची प्रमाणाबाहेर वाढवणे बेकायदेशीर आहे. एचआयडी किंवा एलईडी लाईट: समोरील वाहना चालकाचे डोळे दिपतील असे अति तीव्र क्षमतेचे दिवे लावण्यास बंदी आहे. महत्त्वाची टीप: गाडीत कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून लेखी परवानगी घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. नियम न पाळल्यास मोठा दंड होऊ शकतो किंवा गाडी जप्त केली जाऊ शकते.






