फोटो सौजन्य: iStock
आज देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटमाट साजरा झाला. या 79 वर्षात देशाने विविध क्षेत्रात भरारी घेतली. यातीलच एक मोठे क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. जिथे 79 वर्षांपूर्वी कार खरेदी करणे फक्त श्रीमंत व्यक्तीनाच जमायचे, आज त्याच भारतात मध्यम वर्गीय व्यक्ती सुद्धा कार खरेदी करत आहे. 79 वर्षांपूर्वी देशाला फक्त इंधनावर चालणाऱ्या कार दिसत होत्या. आज त्याच देशात इलेक्ट्रिक कार्स धावत आहे.
भारतात अनेक कार्स आल्या आणि गेल्या सुद्धा, मात्र काही कार्स अशा होत्या ज्यांनी भारतीय ऑटो उद्योगात बदल घडवून आणला. पुढे या कार्स देशाच्या प्रगतीची आणि बदलाची ओळख बनल्या. चला जाणून घेऊया त्या 5 कार्सबद्दल, ज्याशिवाय स्वतंत्र भारताच्या ऑटो उद्योगाची कहाणी पूर्ण होणारच नाही.
वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
1958 मध्ये लाँच झालेली हिंदुस्तान अॅम्बेसेडर ही त्या काळातील सरकारी ऑफिसेस, वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांची पहिली पसंती बनली होती. या कारचा मालक असणे ही अभिमानाची गोष्ट होती. त्याचे डिझाइन, मजबूत बॉडी आणि मोठे केबिनने या कारला खास बनवत होते. पुढे 2014 मध्ये या कारचे उत्पादन बंद झाले असले तरीही भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात ते ‘क्वीन ऑफ द रोड’ म्हणून ओळखले जाते.
1983 मध्ये लाँच झालेल्या मारुती 800 ने भारतीय वाहन उद्योगात क्रांती घडवून आणली. ही कार किफायतशीर, चालवण्यास सोपी आणि मेंटेनन्ससाठी स्वस्त होती. या कारने खऱ्या अर्थाने लाखो भारतीयांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. जवळजवळ 30 वर्षे भारतीय रस्त्यांवर या कारने अधिराज्य गाजवले आणि 2014 मध्ये ती बंद करण्यात आली.
कोरियन ब्रँड ह्युंदाईने 1997 मध्ये सॅन्ट्रो बाजारात आणली आणि ती लगेचच भारतीय कुटुंबांची आवडती हॅचबॅक ठरली. कॉम्पॅक्ट डिझाइन, जास्त मागील हेडरूम आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे तिने सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवले. सततच्या अपडेट्समुळे ती अनेक वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली.
1998 मध्ये लाँच झालेली होंडा सिटी भारतीय बाजारपेठेत प्रीमियम सेडानचा नवा ट्रेंड घेऊन आली. आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि लक्झरी फीचर्समुळे ती वेगळी ठरली. आजही ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या आणि विश्वासार्ह सेडानपैकी एक मानली जाते.
2002 मध्ये आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने भारतीय एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवा इतिहास रचला. दमदार लूक, ऑफ-रोड क्षमता आणि पॉवरफुल इंजिनमुळे ही कार ग्राहकांची आवडती कार बनली. सातत्याने येणाऱ्या नवीन व्हर्जन्समुळे आज स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक हे मार्केटमध्ये याचे सर्वात लेटेस्ट मॉडेल आहेत.