फोटो सौजन्य: iStock
दिवाळीच सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा या शुभ प्रसंगी अनेक जण नवीन कार किंवा बाईक घेताना दिसतात. अनेक ऑटो कंपनीज सुद्धा या काळात आकर्षक ऑफर्स आपल्या कार्सवर देत असतात तर काही जण नवीन कारच लाँच करताना दिसतात.
कार घेताना प्रत्येकालाच तिचे पूर्ण पेमेंट करता येत नाही. अशावेळी एक ठराविक रक्कम दिल्यानंतर आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते व नंतर ते ठराविक वर्षासाठी व्याजासह फेडावे लागते. काही वेळेस हे कर्ज काही जणांना फेडता येत नाही ज्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आपण कार घेताना झिरो डाउन पेमेंटवर ती कशी घेऊ शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: ‘या’ आहेत बेस्ट 1000CC बाईक्स; फक्त चालत नाहीत धावतात…
साधारणपणे, बँका त्यांच्या काही खास ग्राहकांना नवीन कारच्या खरेदीवर झिरो डाउन पेमेंट सारखी सुविधा देतात. पण ज्या लोकांना ही सुविधा दिली जाते त्यांना ऑफर देण्यापूर्वी बँक त्यांची अनेक प्रकारे पडताळणीही करत असते.
बँकेकडून झिरो डाउन पेमेंट सारख्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सिबिल खूप महत्वाचे आहे. जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असेल, तर बँक त्याला कमी वेळेत आणि आकर्षक व्याजदरासह 100 टक्के कार पेमेंट सारख्या सुविधा देते. पण जर काही कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला डाऊन पेमेंट करूनही कर्ज घेण्यात अडचण येऊ शकते.
कारवर झिरो डाऊन पेमेंटची सुविधा मिळवण्यासाठी कारची किंमत देखील महत्त्वाची आहे. साधारणपणे अशा ऑफर कंपनीज कमी किंमतीच्या कारवर सहज देतात. पण जर एखाद्या व्यक्तीला जास्त किंमतीच्या कारवर अशी ऑफर घ्यायची असेल तर बँकेकडून अनेक प्रकारची पडताळणी करावी लागते.
हे देखील वाचा: EV की CNG, कोणत्या कारला आग लागण्याचा धोका असतो जास्त? जाणून घ्या कारण
कार लोन मिळविण्यासाठी, सिबिल स्कोअरसह, इतर काही गोष्टी देखील बँकेद्वारे व्हेरिफाय केल्या जातात. बँकेला उत्पन्नाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, आयटीआर यासह काही इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. यासोबतच कर्जदाराकडे इतर कोणतेही कर्ज तर नाही ना हे सुद्धा बँक तपासते.
जर तुम्हाला बँकेकडून झिरो डाउन पेमेंटच्या सुविधेसह नवीन कार खरेदी करण्याची ऑफर मिळाली, तर कारची एक्स-शोरूम किंमत, कार रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आणि इन्शुरन्सचाही त्यात समावेश असतो. याशिवाय काही ग्राहक त्यांच्या नवीन कारची डिलिव्हरी घेताना शोरूममधून काही ॲक्सेसरीज किंवा एक्सटेंडेड वॉरंटी देखील घेतात. परंतु बहुतांश बँका त्यांना कर्ज देत नाहीत.