'हा' आहे जगातील सर्वात स्वस्त हेलीकॉप्टर, किंमत Toyota Fortuner पेक्षाही कमी
लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस, आजही आकाशात विमान किंवा हेलिकॉप्टरचा आवाज आला तरी आपल्या नजर आकाशाकडे जातात. कित्येक चित्रपटात आपण हेलिकॉप्टर पाहत असतो. खासकरून एखादा स्पाय चित्रपटात तर हिरोकडून एखादे मिशन पूर्ण करण्यासाठी हमखास हेलिकॉप्टर वापरला जातो.
हल्ली अनेक जणांना विमानात बसता येत आहे, पण क्वचित असे लोकं असतात ज्यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करता येतो. म्हणूनच हेलिकॉप्टर हे नेहमीपासूनच एक लक्झरी विमान राहिले आहे. आजकाल तर मराठी मालिकेत सुद्धा नायकाच्या एंट्रीसाठी हेलिकॉप्टर वापरले जात आहे.
अनके जणांना असे वाटते की हेलिकॉप्टरची किंमत ही कोटींमध्ये असते. काही बाबतीत ही गोष्ट खरी जरी असली तरी आज आम्ही तुम्हाला एक अशा हेलिकॉप्टरबद्दल सांगणं आहोत जयची किंमत टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा कमी आहे.
हे देखील वाचा: Honda Activa 110 विकत घ्यायची आहे? 10 हजार डाउन पेमेंट केल्यावर किती असेल EMI?
जगातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर “हेलिकॉप्टर उमो (Helicopter UM-1) किंवा “मॉस्किटो हेलिकॉप्टर “हे एक हलके वजन असणारे पर्सनल हेलिकॉप्टर आहे. ज्यांना हवेत उडण्याचा ,मनमुराद आनंद लुटायचा आहे अशांसाठी हे हेलकॉप्टर बनवण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर खाजगीरित्या वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यात हाय-टेक कमर्शियल हेलिकॉप्टर सारखी अॅडव्हान्स फीचर्स नाहीत.
मॉस्किटो हेलिकॉप्टर सारख्या मॉडेलची किंमत सुमारे 20,000 ते 40,000 डॉलर्स आहे. भारतीय चलनात याची किंमत सुमारे 16-33 लाख रुपये आहे. या हेलिकॉप्टरचे वजन हलके आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 1 ते 2 लोकं आरामात बसू शकतात.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांपासून वाहनांचे कसे कराल संरक्षण? दुर्लक्ष केल्यास उडेल आगीचा भडका
हा हेलिकॉप्टर लहान इंजिनसह चालवतात. या हेलिकॉप्टरला मर्यादित वेग आणि रेंजसाठी तयार केले गेले आहे. हे हेलिकॉप्टर असेम्ब्ल करून खरेदी केले जाऊ शकते याची देखभाल देखील अगदी सोपी आहे.
महत्वाची माहिती: जरी हे हेलिकॉप्टर कमर्शियल उड्डाणांसाठी योग्य नसले तरी कमी बजेटमध्ये हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करण्याचा अनुभव देण्यासाठी ते एक उत्तम पर्याय आहेत.