फोटो सौजन्य: iStock
दिवाळी हा एक असा सण आहे ज्यामुळे प्रत्येकाच्या घरातील वातावरण आनंददायी आणि चैतन्यमे होतं. या शुभ काळात आणि आपल्या जिवलग व्यक्तींना भेटतो, त्यांच्यासाठी मिठाई आणि भेट वस्तू घेऊन जातो. या काळात अनेक जण नवनवीन कपडे सुद्धा खरेदी करत असतात.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नवीन सुरुवात करत असतात. काही जण आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करतो तर काही नवीन नोकरी. पण दिवाळीत अनेक जण आपल्या हक्काची कार किंवा बाइक सुद्धा घेताना दिसतात. ऑटो कंपनीज सुद्धा या काळात आपल्या कार्सवर आकर्षक ऑफर्स लाँच करत असतात. जेणेकरून जास्तीतजास्त कार्स विकल्या जातील.
हे देखील वाचा: बाईकचा ब्रेक अचानक फेल झाल्यास तिला थांबवावे कसे? सुरक्षित प्रवासासाठी जाणून घ्या
दिवाळी म्हंटलं की फटाके फोडणे आलेच. हल्ली सोशल मीडियावर असे कित्येक व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यात फटाक्यांमुळे कुठे आग लागण्याची घटना घडत असते. अनेक कार आणि बाईक मालकांना आपले वाहन फटाक्यांपासून वाचवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. म्हणूनच आज आपण यंदाच्या दिवाळीत आपल्याला कार किंवा बाईकला फटाक्यांपासून कसे वाचवावे याबद्दल जाणून घेणार आहोत.
आपले वाहन पार्किंग एरियामध्ये पार्क करा: फटाक्यांचा धूर आणि ठिणग्या पोहोचू शकत नाहीत अशा सुरक्षित आणि मोकळ्या जागेत आपली कार किंवा बाईक पार्क करा.
कव्हरचा वापर करा: शक्य असल्यास, आपल्या कारवर चांगल्या क्वालिटीचे कव्हर घाला. हे स्पार्क्स आणि धूळ पासून तुमच्या बाईक आणि कारचे संरक्षण करेल.
कारच्या खिडक्या बंद ठेवा: कारच्या सर्व खिडक्या पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा जेणेकरून फटाक्याचा धूर आणि मलबा आत जाऊ नये.
फटाक्यांपासून गाडी लांब ठेवा: फटाके पेटवताना तुमची गाडी तिथून दूर शक्य तितक्या लांब ठेवा. शक्य असल्यास, कार गॅरेजमध्ये ठेवा.
हे देखील वाचा: EV की CNG, कोणत्या कारला आग लागण्याचा धोका असतो जास्त? जाणून घ्या कारण
इलेक्ट्रिकल सर्किट तपासा: फटाक्यांमुळे गाडीमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होण्याचा धोका आहे. अशावेळी तुमच्या कारच्या इलेक्ट्रिकल सर्किट्सच्या स्थितीवर लक्ष ठेवा.
धोकादायक साहित्यापासून दूर राहा: गाडीभोवती ज्वलनशील पदार्थ (जसे की कागद, कपडे इ.) ठेवू नका.
सुरक्षा उपकरणे ठेवा: तुमच्या कारमध्ये अग्निशामक यंत्र ठेवा जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करता येईल.
निष्काळजीपणा करू नका: काही वेळा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सुरक्षिततेबाबत नेहमी सतर्क आणि गंभीर रहा.
या वरील उपायांचा अवलंब करून तुम्ही दिवाळीत तुमची गाडी सुरक्षित ठेवू शकता आणि सणांचा पुरेपूर आनंद लुटू शकता.