फोटो सौजन्य: Social Media
दिवाळीचा सण चालू झाला आहे. हा सण तास प्रत्येक भारतीयाचा आवडता सण असतो. या सणासुदीत अनेक अनेक जण आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटत असतो. तसेच या काळात अनेक जण स्वतःचा व्यवसाय किंवा काही तरी नवीन गोष्टी चालू करून एक नवी सुरुवात करत असतात.
दिवाळीत वाहनांच्या विक्रीला सुद्धा सुगीचे दिवस येतात. अनेक जण यावेळी कार आणि स्कूटर खरेदी करत असतात. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये स्कूटर म्हंटलं की अनेकांना होंडा कंपनी आठवते. कंपनीने लाँच केलेली अॅक्टिव्हा आजही मार्केटमध्ये एक लोकप्रिय स्कूटर आहे. म्हणूनच कंपनी सुद्धा ही स्कूटर वेगवेगळ्या व्हर्जनसह लाँच करत आहे.
हे देखील वाचा: 10 लाखाच्या कार्सच्या विक्रीला लागली उतरती कळा, मारुतीच्या चेअरमननी सांगितले कारण
एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये जपानी दुचाकी उत्पादक Honda ने Activa 110 ऑफर केली आहे. तुम्हीही दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर ही स्कूटर खरेदी करणार असाल, तर दरमहा किती रुपयांची EMI भरून ती घरी आणू शकता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Honda Activa 110 ही जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Honda ने एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरियंट STD ची एक्स-शोरूम किंमत 76684 रुपये आहे. त्यानंतर 7635 रुपये आरटीओ शुल्क आणि सुमारे 6,000 रुपये विमा शुल्क घेतले जाते. एक्स-शोरूम, आरटीओ आणि विमा शुल्क जोडल्यानंतर, या स्कूटरची ऑन-रोड किंमत 90388 रुपये होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
तुम्ही दिवाळी 2024 च्या निमित्ताने Honda Activa 110 चे बेस व्हेरियंट STD विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 10,000 रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 80,388 रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 11 टक्के व्याजासह तीन वर्षांसाठी 80388 रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा केवळ 2970 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 880388 रुपयांचे टू व्हीलर लोन तीन वर्षांसाठी 11 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला तीन वर्षांसाठी दर महिन्याला 2970 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, तीन वर्षांत तुम्हाला होंडा ॲक्टिव्हाच्या एसटीडी व्हेरियंटसाठी सुमारे 26541 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्कूटरची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 1.17 लाख रुपये असेल.