जागतिक मंचावरच भिडले AI च्या दुनियेतील 'हे' दिग्गज; समिटमधीत त्या कृतीने खळबळ, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या परिषदेत जगातील दोन सर्वात मोठ्या एआय कंपन्यांचे प्रमुखही आले आहे. Open AI चे सॅम आल्टमन आणि Anthropic चे डारियो अमोदेई देखील उपस्थित होते. परंतु या दोघांमध्ये एक रंजक तितकाच आश्चर्यकारक प्रसंग घडला. जागतिक मंचावर दिग्गजांच्या फोटो सेशन दरम्यान दोन्ही कंपन्यांच्या मालाकांमधील बिझनेस रायव्हलरी स्पष्टपणे दिसून आली. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी याला AI Cold War म्हटले आहे.
या एआय समिटच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक टेक लीडर्सची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. टेक लीडर्स ग्रुप फोटेदरम्यान नरेंद्र मोदींच्या दोन्ही बाजूला होते. यावेळी सर्व लीडर्सने ऐक्याचे प्रतीक म्हणून हातात हात धरून वर केले होते. पंतप्रधान मोदींच्या एका बाजुला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई तर दुसऱ्या बाजूला सॅम अल्टमन उभे होते. आश्चर्याची बाब म्हणजे एआयच्या दुनियेतील कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या बाजूला उभे राहिले होते.
Open AI चे सॅम आल्टमन आणि Anthropic चे डारियो अमोदेई जेव्हा एका बाजूला उभे राहिले त्यांनी एकमेकांचा हात धरणे टाळले. दोघांनी केवळ Fist Bump pose दिली. हा विचित्र प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याला एआय च्या दुनियेतील कोल्ड वॉर म्हटले जात आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मीम्सचा पूर आला आहे.
AI Summit 2026: AI समिटमधून Bill Gates ने घेतली माघार, देणार नाही भाषण; का घेतला इतका मोठा निर्णय
व्हायरल व्हिडिओ
This is so hilarious. Nothing can make Sam and Dario hold hands, not even the Prime Minister of India! pic.twitter.com/aRKsjSFXM9 — Yuchen Jin (@Yuchenj_UW) February 19, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी याला एआयच्या दुनियेतील करण-अर्जुनांचा वाद म्हटले आहे, तर जोपर्यंत हे दोन दिग्गज एकत्र येत नाही तोपर्यंत एआयचा विकास होणार नाही अशा सध्या चर्चा सुरु आहे. डारियो अमोदेई एकेकाळी OpenAi चे व्हाइस प्रेसिडेंट ऑफ रिसर्च होते, परंतु २०२१ मध्ये कंपनीच्या धोरणांवरुन त्यांचा सॅम अल्टमॅनसोबत वाद झाला. यानंतर डारियो यांनी कंपनी सोडली आणि Anthropic नावाची स्वत:ची कंपनी सुरु केली. तेव्हापासून दोन्ही दिग्गजांमध्ये स्पर्धा सुरु झाली.






