'ही' इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो मार्केट गाजवणार, मिळणार 2 वर्षांची वॉरंटी
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या दुचाकींपेक्षा इलेक्ट्रिक दुचाक्यांना जास्त प्राधान्य देत असतात. अशातच आता मार्केटमध्ये एका नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारताच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड्सपैकी एक असलेल्या Zelio ई-मोबिलिटीने आज त्यांच्या लोकप्रिय लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Gracy+ चे फेसलिफ्टेड मॉडेल अधिकृतपणे सादर केले. आधुनिक शहरी गरजांनुसार डिझाइन केलेली ही नवी Gracy+ स्कूटर प्रगत कार्यक्षमतेसह, उत्तम आराम व टिकाऊपणासह गिग वर्कर्स, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी आदर्श पर्याय ठरते.
वाह क्या बात ! Mahindra ची ‘ही’ SUV झाली स्वस्त, नवीन किंमत ऐकाल तर आजच बुक कराल
फेसलिफ्टेड Gracy+ ची एक्स-शोरूम किंमत केवळ ₹५४,००० पासून सुरू होते. ही स्कूटर ६ वेगवेगळ्या बॅटरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट ६०V/३०Ah (किंमत ₹६५,०००, रेंज ११० किमी) आणि ७४V/३२Ah (किंमत ₹६९,५००, रेंज १३० किमी) हे दोन पर्याय आहेत. *जेल बॅटरी* प्रकारात ६०V/३२Ah (₹५४,०००, रेंज ८० किमी), ६०V/४२Ah (₹५८,०००, रेंज १०० किमी), ७२V/३२Ah (₹५६,५००, रेंज १०० किमी) आणि ७२V/४२Ah (₹६१,०००, रेंज १३० किमी) हे पर्याय देण्यात आले आहेत.
ही स्कूटर २५ किमी/तास टॉप स्पीड देत असून, एका पूर्ण चार्जमध्ये १३० किमी पर्यंतची रेंज देते. यामध्ये ६०/७२V BLDC मोटर असून ती फक्त १.८ युनिट विजेचा वापर करते. १८० मिमी ग्राउंड क्लीयरन्स, ८८ किलो वजन आणि १५० किलो पेलोड क्षमता यामुळे ती शहरांतील खड्डेमय व अरुंद रस्त्यांसाठी उपयुक्त ठरते.
याशिवाय, हायड्रॉलिक शॉक ॲब्झॉर्बर, डिजिटल डिस्प्ल, डेटाइम रनिंग लाइट्स, कीलेस ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, पार्किंग गियर, USB चार्जिंग पोर्ट व पॅसेंजर फुटरेस्ट यांसारखी स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. स्कूटर व्हाइट, ग्रे, ब्लॅक आणि ब्ल्यू अशा रंगांमध्ये मिळते.
सिंगल चार्जवर 548 KM ची रेंज ! प्रिमियम इलेक्ट्रिक कार MG M9 झाली लाँच, किंमत किती?
झेलीओ ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक कुनाल आर्य म्हणाले, “Gracy+ हे आमच्या डिझाइन, रेंज व परवडणाऱ्या मोबिलिटीच्या दृष्टिकोनाचे मूर्त रूप आहे. सुधारित फीचर्स, एक्स्टेंडेड रेंज आणि सुरक्षिततेवर भर यामुळे हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह व स्मार्ट पर्याय ठरेल.”
झेलीओ Gracy+ वर 2 वर्षांची वाहन हमी, लिथियम-आयन बॅटरीवर ३ वर्षांची आणि जेल बॅटरीवर १ वर्षांची हमी देते. हे मॉडेल कंपनीच्या नवोन्मेषी व ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला पुढे नेत भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावेल.