फोटो सौजन्य: iStock
जगातील सर्वात लोकप्रिय ऑटो कंपनी टेस्ला पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने कंपनीच्या फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) टेक्नॉलॉजीची चौकशी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत, अनेक टेस्ला सेल्फ-ड्रायव्हिंग कारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.
काय लूक आहे राव! नवीन Honda CB1000F सादर, परफॉर्मन्स दमदार अन् किंमत वाचून व्हाल गार
आतापर्यंत, 58 अपघातांची पुष्टी झाली आहे, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाली असून काहींच्या कारना आग देखील लागली आहे. या तपासणीचा परिणाम सुमारे 29 लाख टेस्ला कारवर होईल, ज्यामध्ये मॉडेल 3, मॉडेल Y, मॉडेल S आणि मॉडेल X यांचा समावेश असणार आहे.
NHTSA च्या अहवालानुसार, अनेक चालकांनी तक्रार केली की अपघातापूर्वी कारने कोणतीही चेतावणी दिली नव्हती आणि अचानक नियंत्रण सुटले होते. बहुतेक घटना चौक किंवा रेल्वे क्रॉसिंगजवळ घडल्या. एजन्सीचे म्हणणे आहे की अनेक टेस्ला कार समोरून येणाऱ्या ट्रॅफिक किंवा रेल्वे ट्रॅकजवळ चुकीचे वळण घेत होत्या. आता ही समस्या सॉफ्टवेअरमुळे होती की सेन्सर सिस्टममधील तांत्रिक बिघाडामुळे होती याचा तपास केला जात आहे.
अमेरिकन न्यूज चॅनेल NBC News च्या अहवालानुसार, Tesla कंपनीची FSD (Full Self-Driving) टेक्नॉलॉजी सिसितां अनेक वेळा रेल्वे ट्रॅकजवळ योग्य पद्धतीने थांबत नाही. काही घटनांमध्ये, लाल सिग्नल आणि बंद गेट असूनही या कार्स ट्रॅक ओलांडताना दिसल्या आहेत, ज्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला.
या वर्षाच्या सुरुवातीला NHTSA ने Tesla च्या Summon फीचरचीही चौकशी केली होती. या फीचरच्या मदतीने चालक कारला स्वतःकडे बोलावू शकतो. मात्र, या फीचरमुळे पार्किंग लॉटमध्ये अनेक किरकोळ अपघात झाल्याचे समोर आले आहे.






