फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवस रात्र काम करत असतात. जेणेकरून लवकरात लवकर त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे. भारतात अनेक लोकप्रिय कार आहेत, ज्यांच्या किमतीत जीएसटी कमी झाल्याने मोठी कपात झाली आहे. अशीच एक कार म्हणजे Maruti Wagon R.
मारुती सुझुकी ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. हॅचबॅक सेगमेंटमध्ये, मारुती सुझुकी Wagon R देते. चला जाणून घेऊयात या कारसाठी एक लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्ही दरमहा किती EMI भरू शकता.
5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच
Maruti Wagon R देखील विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. बेस व्हेरिएंटची किंमत 4.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही दिल्लीमध्ये खरेदी केली असेल तर तुम्हाला अंदाजे 20 हजार नोंदणी शुल्क आणि अंदाजे 25000 चा विमा भरावा लागेल. यामुळे ऑन-रोड किंमत 5.44 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत पोहोचते.
जर तुम्ही Maruti Wagon R चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स उपलब्ध करून देईल. अशा परिस्थितीत, तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 4.44 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज देते, तर पुढील 7 वर्षांसाठी दरमहा 7,147 रुपये इतकी EMI तुम्हाला भरावा लागेल.
नवीन कार खरेदी करायची आहे? Nissan ची नवीन C-SUV भारतात येतेय
जर तुम्ही 4.44 लाख रुपयांचे कार लोन 9% व्याजदराने आणि 7 वर्षांच्या मुदतीसाठी घेतले, तर तुम्हाला दरमहा 7,147 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 1.56 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे Maruti Suzuki Wagon R च्या बेस व्हेरिएंटची एकूण किंमत अंदाजे 7 लाख रुपये इतकी होईल.
मारुती सुझुकी एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये वॅगन आर देते. या सेगमेंटमध्ये, ही कार मारुतीच्या Alto K10, S-Presso, Celerio सह Renault Kwid, Tata Tiago सारख्या बजेट कारशी थेट स्पर्धा करते.