• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Nana Patekar And Controversy Nrps

पाटेकरांच्या नाना तर्‍हा…

नाना पाटेकर आणि बातमी हा प्रवास वा नाते मुद्रित माध्यमापासून सोशल मीडियाच्या काळात घट्ट आहे. त्यासाठी काही घडो, न घडो अथवा बिघडो, तो सरळ बोलो अथवा तिरसट, अगदी रोखठोक बोलला रे बोलला त्याची बातमी झालीच. ताजे उदाहरण तुम्हालाही माहिती आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 26, 2023 | 06:00 AM
पाटेकरांच्या नाना तर्‍हा…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘जर्नी’ चित्रपटाच्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील शूटिंगच्या वेळेस त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची धडपड करणाऱ्या चाहत्याला त्याने अशी काही टपलीत मारली की त्याचा केवढा तरी आवाज सोशल मीडियात उमटला. बरं, अशा गोष्टींचा वेगही असा भन्नाट व भारी असतो की लगोलग त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येतात. नाना पाटेकरने याला वेळीच रोखण्यास हिंदीत एक व्हिडिओ शूट करुन तो मीडियात पाठवला. तरी ‘नाना पाटेकरचे घुश्श्ये आणि किस्से’ असा विषय कधीही निघाला रे निघाला या ‘टपलीत मार’ गोष्टीचा उल्लेख होणारच.

नाना पाटेकरचा असाच एक भारी किस्सा त्याच्या आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या भेटीचा! रमेश सिप्पी नानाला एका चित्रपटाच्या संदर्भात तीन चारदा त्याच्या माहिम येथील घरी जाऊन भेटला. (नानाचे माहिमचे घर हाच एक वेगळा विषय. एकदा गणपतीत तेथे मी गेलो होतो.) पण नानाला पिक्चरची थीम आणि भूमिका आवडली तरी मानधनावरुन फिसकटले. यावर नाना ताडकन म्हणाला (म्हणे), ‘तुझी शोलेमुळे किंमत वाढली असली तरी माझीही किंमत कमी होत नाही… हा किस्सा खूप गाजला. त्या काळातील अनेक वृत्तपत्रात, साप्ताहिकात, मासिकात रंगवून खुलवून (आणि उगाच वाढवूनही) प्रसिद्ध झाला. दिग्दर्शक सुभाष घईचाही नाना पाटेकर भेटीचा अतिशय भारी रंगतदार किस्सा आहे. एका मुलाखतीत त्यानेही तो ‘नानाचा अनुभव किस्सा’ सांगितला होता आणि मग असाच पसरत गेला. ‘सौदागर’ (१९९१) च्या यशानंतर सुभाष घईने नाना पाटेकरला घेऊन एक ‘अंकुश’सारखाच पण नानाभोवती संपूर्ण थीम असलेला असा ‘खलनायक’ निर्माण करायचे ठरवले. आपण एकादा वेगळा चित्रपट निर्माण करावा असा घईचा त्यामागचा हेतू होता. पण चार- पाच सिटींगनंतर सुभाष घईच्या लक्षात आले की, बहुतेक नानाच या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल, आपण सेटबाहेर बसू आणि तास मोजत बसू. म्हणून त्याने नानाचा नाद सोडला आणि पटकथेत मनोरंजनाचा भरपूर मिक्स मसाला टाकला आणि संजय दत्तला हीरो करीत ‘खलनायक’ बनवला.

नाना पाटेकरचे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘नाना किस्से’, तिरके किस्से इतक्यात संपत नाहीत.
बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘आवाम’च्या निमित्ताने नाना पाटेकरला राजेश खन्नासोबत भूमिका करायची मिळालेल्या संधीतही नानाने आपला स्पष्टवक्तेपणा दाखवलाच. हा किस्सा त्या काळात चक्क चौकटीत प्रसिद्ध झाला. तो राजेश खन्नाला म्हणाला, काका, तुझा खरा अभिनय पाहण्यासाठी खामोशी, आनंद, इत्तेफाक, बहारो के सपने, आराधना, अमर प्रेम, बावर्ची हे चित्रपट कितीही वेळा पहायची माझी तयारी आहे आणि पाहिलेदेखिल आहेत. पण त्यानंतर मात्र, तो क्लास दिसला नाही… हा किस्सा त्या काळात फिल्मी अड्डे, कट्टे, नाके यावर हमखास चर्चेत असेच. अशा गोष्टीतून नानाची एक वेगळी इमेज आकाराला आली. कोणाला त्यावरुन राजकुमारची आठवण येई. एकदा त्या काळात दिग्दर्शक मेहुलकुमार यांचे प्रसिद्धी प्रमुख गजा आणि अरुण यांनी मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना एक सुखद अनुभवाची संधी दिली. ‘तिरंगा’ या चित्रपटातील ‘पी ले पी ले ओ मोरे राजा’ या गाण्याचे वांद्र्याच्या बॅण्ड स्टॅण्डवरील एका बंगल्यात शूटिंग आहे, राजकुमार आणि नाना पाटेकर आहेत, अवश्य ये असा अनेकांना निरोप मिळाला. मीडियात असल्याने असे सोनेरी-चंदेरी योग आले असता ते दवडायचे नसतात. (तो बंगला नंतर शाहरूख खानने घेऊन त्याचे नाव मन्नत ठेवले). एकाच वेळेस दोन तिरकस म्हणून ओळखले जाणारे बडे स्टार सेटवर आहेत  हे तेव्हा वातावरणात जाणवले. जानी राजकुमार असल्याचा कोणताही दबाव नानाने घ्यायचा का? तसे दोघेही नृत्यासाठी अजिबात ओळखले न जाणारे (हीदेखील दोघांची काॅमन खासियत. असतात काही योगायोग.) त्यामुळेच तर शूटिंग सुरळीत पार पडले असावे. लंच ब्रेकमध्ये राजकुमार आपल्या जणू नियमानुसार एक तासासाठी आपल्या रूममध्ये गेला तर नानाने सेटवरील सिनेपत्रकारांशी छान गप्पा केल्या. तेव्हा प्रकर्षाने जाणवले ते त्याचे खरेपण. तो तुसडा, लहरी म्हणून तेव्हा ओळखला जाई हे कितीही खरे असले तरी इतरांच्या वागण्यावरची ती प्रतिक्रिया असे. ते वागणेच जर ठीक नसेल तर?

नानाने दिग्दर्शित केलेल्या ‘प्रहार’ या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टीगसाठी मुंबईतील आम्हा सिनेपत्रकाराना निर्माता सुधाकर बोकाडे यांनी फिल्मालय स्टुडिओत आमंत्रित केले होते. येथे उभारलेल्या सेटवर बरेच दिवस शूटिंग होत होते. नाना अतिशय उत्तम रितीने व शिस्तबद्धतेने काम करतोय हे सेटवर पाऊल टाकताच अनेकांच्या लक्षात आले. डिंपल आणि माधुरी दीक्षितवर काही दृश्ये चित्रीत होत असताना नानाला जराही अनावश्यक बडबड, आवाज मान्य नव्हता. तसे त्याने स्पष्टपणे म्हटलही. मग त्याच्या याच शिस्तबद्ध  वागण्याचे कौतुक होऊ लागले.

१९९४ चा श्रीगणेश चतुर्थीचा दिवस.
अंधेरीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये दुपारी चार वाजता बिंदा ठाकरेनिर्मित आणि पार्थो घोष दिग्दर्शित ‘अग्निसाक्षी’चा बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुहूर्त असे आमंत्रण हाती येताच मनात दोन प्रश्न आले. गिरगावातील खोताचीवाडीतील आपल्या घरी दीड दिवसाचा गणपती असताना या मुहूर्ताला कसे जायचे आणि दुसरा प्रश्न असा की, खुद्द नाना माहिमच्या आपल्या घरच्या गणपतीची आरास तो स्वतः करतो तर त्याचीही घाई असेलच… काही असले तरी हा मुहूर्त खूप महत्वाचा होता (त्या काळात अशा मुहूर्तांचे खूप मोठे प्रस्थही होते. ते एक वेगळे फिल्मी कल्चर होते). प्रत्यक्षात गेलो तेव्हा अतिशय प्रसन्न वातावरणात मुहूर्त होतेय हे लक्षात आलं. तरी नानाची अस्वस्थता लपत नव्हती. त्याला घरी जायचे वेध लागलेत आणि बाळासाहेबांच्या शुभ हस्ते मुहूर्ताचा क्लॅप दिला गेल्यावर नाना आणि जॅकी श्राॅफने मुहूर्त दृश्यात भाग घेतला. ते होताच बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत नाना निघणार तेवढ्यात धर्मेंद्र आला. अर्थात, त्यामुळे थोडासा वेळ जाणारच याची नानाला कल्पना आली. घरी जाऊन गणपतीची पूजा करायचीय हे त्याच्या देहबोलीत लपत नव्हते. अशातच मी म्हणालो, नाना ‘क्रांतीवीर’ हिटवर  पूर्ण पान मुलाखत करायचीय. कधी फोन करून भेटू? यावर निघता निघता तो म्हणाला, घरी गणपतीला ये मग बघू…
नाना पाटेकर अतिशय स्पष्टवक्ता, मूडी, लहरी अशी काही इमेज एस्टॅब्लिज झाली असली तरी हे त्याचे रुप अगदी वेगळे होते.
ती मुलाखत मग त्याच्या लोखंडवाला संकुलातील घरी रंगली आणि जीन्स- शर्टमधील नानाच्या मोठ्या फोटोसह ती प्रसिद्ध झाली.
असेच त्याचे वेगळे रुप तत्पूर्वी  दिसले होते  ते एन. चंद्रा दिग्दर्शित ‘अंकुश’ (१९८६) च्या न्यू एक्सलसियरच्या मिनी थिएटरमधील प्रेस शोच्या वेळी! ‘आपली फिल्म’ अशा भावनेने त्याने या चित्रपटाच्या निमित्ताने फोकस्ड मुलाखती देताना वांद्र्याच्या कार्टर रोडवरील शूटिंगच्या वेळचे अनुभव, वातावरण यावर भर देत या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली होती आणि त्यानंतर तो आम्हा सिनेपत्रकारांच्या प्रेस शोच्या मध्यंतरमध्ये आला. त्याला समिक्षकांकडून जाणून घ्यायचे होते की, फिल्म कशी वाटली? त्याच्या त्या वेळच्या देहबोलीत मला जाणवलं ते, ‘अंकुश’ प्रेक्षकांपर्यंत समिक्षकांच्या माध्यमातून व्यवस्थित जावा आणि सिनेमाला यश लाभावे. नानाच्या इच्छेप्रमाणे हे घडले. एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’ (१९८७) च्या नाशिकच्या सेटवरचा नाना यापेक्षाही वेगळा. तेव्हाचे नाशिक अगदी छोटेसे शहर अथवा मोठे गाव होते. नानाने चंद्रांकडून पूर्ण दृश्य समजून घेऊन मग भरपूर रिहर्सल केली आणि मग आपले आणि चंद्रा यांचे समाधान होईपर्यंत टेक/रिटेक सुरु राहिले. नाना आपल्या चित्रपटाच्या पटकथेत आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे गुंतत जातो याची ही छोटीशी झलकच होती. पण फिल्मी मीडियाला नानाचे तिरपागडे किस्से हवे असत. तसेही काही प्रसिद्ध झाले. त्यात तत्थ किती हे ‘नाना जाणे’.
नानाभोवती एक गूढ प्रतिमा तयार झाल्यानेच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ (२०१६) नाना साकारणार या बातमीने सगळे अवाक झाले. महेशही रोखठोक उत्तर देणारा आणि अपेक्षित परफॉर्म मिळवणारा. नाना तो देईलच, पण सेटवर नेमके कोण कोणाचे ऐकणार? नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे ‘नटसम्राट’च्या मुहूर्तासाठी मुंबईचे आम्ही पत्रकार गेलो होतो. तेव्हा दिवसभरात नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांना एकमेकांबरोबर काम करण्यास काही प्राॅब्लेम असल्याचे जाणवले नाही. पण आपणास अशा अर्थाचे प्रश्न अनेक जण आडून अथवा उघडपणे केला जातो हे दोघांच्याही बोलण्यात आले (हे अर्थात दोघांच्याही प्रतिमेतून आले). विशेष म्हणजे, पूर्वनियोजित वेळापत्रकापेक्षा कमी दिवसात हा चित्रपट पूर्ण करुन दोघांनीही फिल्म इंडस्ट्री आणि मीडिया अशा दोघांचेही अंदाज/अपेक्षा फोल ठरवल्या. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने नानाने प्रिन्ट, चॅनल, डिजिटल अशा सर्वच माध्यमात भरपूर मुलाखती दिल्या, आपण साकारलेल्या ‘नटसम्राट’च्या तो खूपच प्रेमात पडलाय हे लक्षात आले; तसेच हीच त्याच्यातील बदलाचीही सुरुवात आहे असे माझ्या लक्षात आले. हाच नाना ‘परिंदा’, ‘खामोशी द म्युझिकल’ या चित्रपटांच्या काळात सहजासहजी मुलाखत देत नसे. त्याच्या घरी लॅन्डलाईनवर फोन केल्यावर तो स्वतःच फोन उचलून आवाज बदलत सांगायचा, नाना घरी नाही. ते लॅन्डलाईनचे दिवस होते; तसेच आपला चित्रपट पाहून मग काय ते प्रश्न करा, ही नानाची अगदी योग्य भावना असे. कधी कधी मुलाखतीसाठी हो बोलण्यापूर्वी तोच चार पाच प्रश्न करत पत्रकाराचा अंदाज घेई. पण त्याचा नेमका ‘उलटा अर्थ’ काढला जाई).

जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये ‘आपलं माणूस’ (२०१८)च्या फस्ट लूकच्या वेळी नानातील बदल मोठ्या प्रमाणावर लक्षात आला. आपल्या चित्रपटावर, सहकारी कलाकारांवर बोलता बोलता तो आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवरही भरभरून बोलला.
नाना पाटेकरचा अभिनय प्रवास चाळीसपेक्षा जास्त वर्षांचा आहे. पण तरीही तो सहजी समजेल असा नाही. त्याच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आणि हेच त्याचे वेगळेपण आहे. एका चाहत्याला त्याने टपलीत मारली यानिमित्त हा एक फोकस.

– दिलीप ठाकूर

Web Title: Nana patekar and controversy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
1

Ashish Warang Death: लोकप्रिय अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा
2

मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा

‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा
3

‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!
4

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, शरीराला पोहचेल हानी

झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, शरीराला पोहचेल हानी

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय

Budh Mangal Yuti: तूळ राशीत बुध-मंगळाचा दुर्लभ संयोग, 4 राशींना मिळणार अथांग धनदौलत, होणार प्रगती

Budh Mangal Yuti: तूळ राशीत बुध-मंगळाचा दुर्लभ संयोग, 4 राशींना मिळणार अथांग धनदौलत, होणार प्रगती

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; सलग ४१ तास अखंड…

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव

या घोटाळ्याने भल्या भल्या चोरांने केले चकित; भष्ट्राचाराच्या जमिनीत गाडला गेला तलाव

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.