लातूर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.महानगर पालिकेच्या 70 जागांसाठी चार दिवसात भाजपा कार्यालयात तब्बल एक हजार इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्याचा शेवटचा दिवस असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता भाजप पदाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजप कार्यालयाला सध्या जत्रेचे स्वरूप आले असून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार प्रयत्न करत आहेत… मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून पक्ष श्रेष्ठी सक्षम उमेदवार निवडतील असे भाजपा पदाधिकारी यांनी सांगितले आहे.