मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करण्यास मदत करते. पण हल्ली बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे किडनीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. किडनी निकामी झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. त्यामुळे सतत जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे आहारात जास्त सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला किडनीच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाणे आत्ताच सोडून दिल्यास भविष्यातील आजारांपासून शरीराचा बचाव होईल. (फोटो सौजन्य – istock)
'या' चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार

जेवणाची चव वाढण्यासाठी पदार्थ बनवताना कायमच मिठाचा वापर केला जातो. पण काहींना आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन करण्याची सवय असते. मिठामध्ये असलेल्या सोडियममुळे उच्च रक्तदाब वाढतो.

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्रक्रिया केलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, अस्वास्थ्यकर चरबी आणि सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते.

किडनीचे आजार होण्यामागील महत्वपूर्ण कारण म्हणजे कमी पाण्याचे सेवन. शरीराला दिवसभरात ३ लीटर पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या कमी सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते.

जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने दीर्घकालीन मूत्रपिंड रोग, शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड रोग होण्याची जास्त शक्यता असते. मूत्रपिंडांसाठी लाल मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो.

तळलेले स्नॅक्स खाल्ल्यामुळे किडनीच्या आजारांची लागण होते. याशिवाय पुन्हा पुन्हा गरम केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ, लठ्ठपणा आणि रक्तदाबाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते.






