Rohit Pawar RSS Allegation: सरकारी विद्यापिठांच्या उच्च पदांवर RSSचा ताबा...; रोहित पवारांच्या आरोपांमुळे राजकारण तापणार
नागपूरमधील विधानभवन संकुलात रोहित पवार यांनी मांध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी संसदेत केलेल्या विधांनांचे समर्थनही केले. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक सरकारी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी केल्यास त्यांचे आरएसएस (RSS) शी असलेले संबंध उघड होतील.
पुणे विद्यापीठासह अनेक सरकारी विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी पाहिली असता ते आरएसएसशी संबंधित आहेत किंवा ते आरएसएस च्या विचारसरणीचे पालन करताना दिसतात. विद्यापीठांच्या उच्च पदावर बसण्यासाठी जी गुणवत्ता लागते, ती त्यांच्याकडे नाही. या विद्यापीठांमध्ये बहुतेक गरीब आणि मध्यमवर्गीय खाजगी संस्थांचे महागडे शुल्क परवडत नसल्याने ती कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत, सरकारी विद्यापीठांच्या घसरत्या गुणवत्तेचा थेट परिणाम समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांवर होत आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, ही प्रवृत्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही तर राज्यातील इतर विद्यापीठांमध्येही दिसून येत आहे. राहुल गांधी जे म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. अनेक विद्यापीठांमध्ये आरएसएसचा प्रभाव वाढत आहे आणि याचा शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत आहे.
Power Export : Modi सरकारचा निर्णय महत्त्वाचा! Nepalचा Bangladeshसोबत ‘वीज डिप्लोमसी’चा मोठा
हा प्रकार एका मोठ्या अजेंड्याचा भाग आहे का असे विचारले असता, हो, १००%. असे उत्तर दिले. तसेच विद्यापीठांमध्ये आरएसएस स्वयंसेवकांना विविध पदांवर नियुक्ती करण्यासाठी त्यांना केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक मदत देत आहेत. या माध्यामातूल आरएसएस किंवा भाजपचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. त्यासाठी ते हा सरकारी निधीचा गैरवापर करत आहेत. असंही रोहित पवार यांनी सांगितले. त्याचवेळी जर ही परिस्थिती अशीच राहिली तर जग वेगाने प्रगती करत राहील, तर भारत शिक्षणासह इतर क्षेत्रातही मागे पडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






