कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आयोजित देवगंधर्व महोत्सव यंदा त्रिवेणी संगमाचे ऐतिहासिक स्वरूप घेऊन येत आहे. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात देशातील नामवंत शास्त्रीय गायक-वादक उपस्थित राहून संगीतप्रेमींना अविस्मरणीय मैफलांची मेजवानी देणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली असून आयोजक प्रशांत दांडेकर यांनी यंदाचा सोहळा कलाप्रेमींसाठी विशेष ठरणार असल्याचे सांगितले.