कर्जत नगरपरिषद निवडणुकीनंतर मतमोजणीपूर्वी स्ट्राँग रूमची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून संपूर्ण परिसर २४ तास सशस्त्र पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, कडक प्रवेश तपासणी आणि नियंत्रण रेषा या माध्यमातून पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे. २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीपूर्वी उमेदवारांना सीसीटीव्ही स्क्रीनवर स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष स्थिती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.






