4 वर्षात 50 हजाराचे झाले 25 लाख, एका वर्षात 400 टक्के परतावा, आता स्टॉक विभाजन हाेणार!
शेअर बाजारात एका स्मॉल कॅप शेअर्सने 2024 मध्ये आतापर्यंत 194 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 4 वर्षात शेअर्सची किंमत 4900 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. आता कंपनीने शेअर विभाजनाची म्हणजे स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. ही कंपनी सिस्टिमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस (Systematix Corporate Services) आहे. कंपनी एक आघाडीची वित्तीय सेवा फर्म असून, ती गुंतवणूक व्यवस्थापन आणि सल्लागार सेवा प्रदान करते.
सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस ग्रुप 1985 मध्ये सुरू झाला. सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या ग्राहकांमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय), देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय), विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो. सिस्टिमॅटिक्सचे मुख्य व्यवसाय विभाग ब्रोकिंग, मर्चंट बँकिंग, गुंतवणूक बँकिंग, वित्तपुरवठा आहेत.
(फोटो सौजन्य – iStock)
38 रुपयांचा शेअर्स 1916 रुपयांवर
सिस्टिमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे शेअर्स 25 ऑक्टोबर रोजी बीएसईवर 1916 रुपयांवर बंद झाले. 4 वर्षांपूर्वी 26 ऑक्टोबर 2020 रोजी शेअरची किंमत 37.75 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत शेअर्सने 4975 टक्के परतावा दिला आहे. एखाद्याने 4 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 20,000 रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त झाली असती. तसेच 50000 रुपयांची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा जास्त, 1 लाख रुपयांची रक्कम 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आणि 2 लाख रुपयांची रक्कम 1 कोटी रुपये झाली असती.
एका वर्षातील परतावा
बीएसईच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात शेअर्सने 400 टक्के परतावा दिला आहे. शेअर्सची किंमत 6 महिन्यांत किंमत 146 टक्क्यांनी वाढली आहे. सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या शेअर्सने 25 ऑक्टोबर रोजी बीएसईवर 52 आठवड्यांचा नवा उच्चांक 2,021 रुपये तयार केला. केवळ एका आठवड्यात शेअर्स 7 टक्क्यांनी वाढला आहे.
स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख
सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस स्टॉक स्प्लिट करणार आहे. या अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभागला जाईल. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 5 नोव्हेंबर 2024 ही निश्चित करण्यात आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)