भारताच्या सर्वात छोट्या पॅसेंजर ट्रेनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit- AI)
Smallest Train in India: भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठे आणि व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे. लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, की देशात एक अशीही ट्रेन आहे, जी फक्त ९ किलोमीटरचा प्रवास करते आणि तिला केवळ तीन डबे आहेत? ही ट्रेन प्रवासासाठी अनोखी तर आहेच, पण तिच्या सुंदर मार्गांमुळे आणि शांत वातावरणामुळे प्रवाशांना एक खास अनुभव देते.
ही अनोखी आणि सर्वात लहान प्रवासी ट्रेन केरळमध्ये धावते. कोचीन हार्बर टर्मिनस (CHT) ते एर्नाकुलम जंक्शन (Ernakulam Junction) पर्यंत ही ट्रेन फक्त ९ किलोमीटरचे अंतर कापते. कमी अंतर असूनही, या ट्रेनचा मार्ग खूप सुंदर आहे. हिरवीगार जंगले, शेतं आणि नद्यांच्या किनाऱ्यावरून जाताना ही ट्रेन प्रवाशांना निसर्गाचे अद्भुत दर्शन घडवते. पर्यटक खास हा अनुभव घेण्यासाठी येथे येतात. ही हिरव्या रंगाची डीईएमयू (DEMU) ट्रेन दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी धावते. ९ किलोमीटरचा हा प्रवास ती सुमारे ४० मिनिटांत पूर्ण करते आणि मध्ये फक्त एकच थांबा आहे.
छठ पूजेसाठी भारतीय रेल्वेची तयारी; तब्बल 12000 हून अधिक विशेष गाड्या धावणार, सुरक्षेसाठी…
या ट्रेनची प्रवासी क्षमता ३०० लोकांची आहे, परंतु यात केवळ १० ते १२ स्थानिक प्रवासीच प्रवास करतात. प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वेने अनेकवेळा ही ट्रेन बंद करण्याचा विचार केला होता. मात्र, पर्यटकांमध्ये या ट्रेनचे असलेले आकर्षण आणि मागणी यामुळे ती अजूनही सुरू आहे. पर्यटक या छोट्या ट्रेनला पसंती देतात कारण यात प्रवास करताना त्यांना नैसर्गिक सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो.
भारतात इतरही काही कमी अंतराच्या ट्रेन्स आहेत, जसे की बरकाकाना-सिधवार पॅसेंजर, गढी हरसरू-फर्रुखनगर डीईएमयू आणि जसीडीह-बैद्यनाथधाम मेमू. पण कोचीन-एर्नाकुलम ट्रेन फक्त ९ किलोमीटरचे अंतर आणि तीन डब्यांमुळे सर्वात खास आहे. तुम्ही केरळला भेट दिल्यास, या मिनी ट्रेनचा प्रवास नक्की करा. हा ९ किलोमीटरचा छोटा प्रवास तुम्हाला शांती आणि हिरवीगार निसर्गाचा अनुभव देईल. कारण प्रवाशांची संख्या वाढली नाही, तर भविष्यात ही अनोखी ट्रेन बंद होऊ शकते.
रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांची तपासणी; फुकट्यांकडून 4.9 लाखांचा दंड वसूल, फक्त एकाच दिवशी…






