आशिया दौऱ्यादरम्यान किम जोंग उन च्या भेटीस तयार ट्रम्प; जिनपिंग यांचीही घेणार भेट, 'या' मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे केले स्पष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Malaysia ASEAN Summit 2025 : वॉशिंग्टन : यंदा २०२५ च्या ४७ व्या आशियान शिखर परिषदेचे मलेशियामध्ये (Malaysia) आयोजन करण्यात आले आहे. क्वालालंपूरमध्ये २६ ते २७ ऑक्टोबर ही परिषद होणार आहे. दरम्यान या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) देखील आशिया दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उनला भेटण्यासाठीही तयारी दर्शवली आहे.
मलेशियाने आशियान असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स परिषदेसाठी ट्रम्प यांना संवाद भागीदार देश म्हणून आमंत्रित केले आहे. ट्रम्प पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरिया देशांना भेट देणार आहे.
रविवारी(२६ ऑक्टोबर) मलेशियाच्या राजधानी क्वालालंपरूमध्ये सुरु होणाऱ्या बैठकीसाठी ट्रम्प सहगभागी होणार आहेत. तर या परिषदेनंकर आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहे. या परिषदेनंतर ट्रम्प चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (XI Jinping) यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी शनिवारी (२५ ऑक्टोबर) एअर वन फोर्सच्या पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ते जिनपिंग यांची भेट घेणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारावर आणि अमेरिका-चीन तणावावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान ते तैवान मुद्यावरही जिनपिंग यांच्याशी चर्चा करतील. तसेच हॉंगकॉंगचे नेते जिमी लाई यांना चीनने अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरीह चर्चा होईल असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राय सुरक्षा कायद्याअंतर्गत चीनने जिमी लाई यांनी अटक केली आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी ते उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांना भेटण्यासाठीही तयार असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, मी किम जोंग उनला भेटण्यासाठी १००% तयार आहे. त्यांच्याशी माझे चांगले संबध आहे, मला संधी मिळाली तर मी नक्कीच त्यांची भेट घेईल.
दरम्यान याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenda Modi) या परिषदेत सहभागी होणार आहेत. परतु ते मलेशियाला जाणार नसून व्हर्च्युअली ही बैठक अटेंड करणार आहेत. पण याच वेळी पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना टाळत असल्याची अटकळ बांधली जात आहे. गेल्या काही महिन्यात भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरु, टॅरिफवरुन, रशियाकडून तेल खरेदीवरुन दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. तसेच ट्रम्प एककीडे मोदींचे कौतुक करत दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही करत आहेत. यामुळेच PM मोदी ट्रम्प यांना टाळत असल्याचे म्हटले जात आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. आशिया दौऱ्यादरम्यान कोणत्या देशांना भेट देणार ट्रम्प?
आशिया दौऱ्यादरम्यान ट्रम्प मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देणार आहे.
प्रश्न २. शी जिनपिंगशी भेटवरी काय म्हणाले ट्रम्प?
आशिया दौऱ्यादरम्यान ट्रम्प शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्र बैठक घेणार आहे. यावेळी ट्रम्प तैवान मुद्यावर आणि हॉंगकॉंगचे नेते जिमी लाई यांच्या सुटकेवर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर






