मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
नाशिक: रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासोबतच महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली, महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे कामही केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले.
या काळात तयार झालेल्या साहित्यातून समकालिन महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, संस्कृतीची माहिती मिळते. ते सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा आहे. विविध आक्रमणे होऊनही महानुभाव विचार समाजात रुजूला. हा पंथ राज्य, देश आणि अफगाणपर्यंत विस्तारला आहे. या परंपरेने समतेचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्त्वाची आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #MahanubhavPanth pic.twitter.com/XuE4oaeFHZ — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 25, 2025
भगवान चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजात प्रभू श्रीकृष्ण यांनी गीतेतून दिलेला विचार रुजविला, तोच संदेश समाजाला दिला. त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणले. समाजात भेदाभेद, विषमता निर्माण झालेली असताना संपूर्ण समाजाला महानुभाव विचारातून एकसूत्रात बांधत त्यांना सन्मार्ग दाखविण्याचे काम चक्रधर स्वामी यांनी केले. मुख्यमंत्री झाल्यावर महानुभाव पंथाच्या स्थळांचा विकास सुरू केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कारंजेकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.
🔸CM Devendra Fadnavis at the '38th Akhil Bhartiya Mahanubhav Parishad Adhiveshan'.
Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, MLA Devyani Pharande and other senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '38 वे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन' येथे… pic.twitter.com/fP4YKEaIjA — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 25, 2025
फडणवीस यांच्या सहकार्यामुळे महानुभाव परिषदेचे विविध उपक्रम मार्गी लागले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.






