आता बाबुली मेस्त्रीचा 'दशावतार' साऊथमध्ये गाजणार!
Dashavatar Release In Malayalam Language: दशावतार हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता होती. त्यात जेष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर याचा मत्स्य अवतारातील लूक तर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यात कोकणातील दशावतारावर बेतलेला चित्रपट असल्यामुळे शहरी भागांसह ग्रामीण भागात सुद्धा या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला.
12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ सिनेमा अजूनही राज्यातील काही थिएटरमध्ये सातव्या आठवड्यातही हाऊसफुल चालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आता हा सुपरहिट मराठी सिनेमा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बाबुली मेस्त्री’चा खेळ लवकरच मल्याळम भाषेत पाहायला मिळणार आहे. याबाबतचे अधिकृत माहिती लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दिली आहे.
५२ व्या वर्षी मलायका पुन्हा लग्न करणार? लग्नाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, ”मला प्रेमावर…”
दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. “चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं! जगभरातील मराठी प्रेक्षकांनी ज्यांना भरभरून प्रेम दिलं आणि आजही देत आहेत. आपला ‘दशावतार’ आता मल्याळम भाषेतून केरळमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय! 21 नोव्हेंबरपासून! आणि आजही महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सातव्या आठवड्यात हाऊसफुल गर्दीत सुरू आहे!”
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दशावतारकलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘बाबुली मेस्त्री’ या कलावंताची भूमिका साकारली आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला आहे. दशावताराच्या शेवटच्या प्रयोगासाठी रंगमंचावर गेलेल्या बाबुलीच्या आयुष्यात घडणाऱ्या अघटित घटनेमुळे कथा पूर्णपणे वेगळे वळण घेते, आणि तेथूनच चित्रपट अधिक रोचक बनतो. तसेच, दिलीप प्रभावळकर हे खरे या चित्रपटाचे राखणदार ठरले आहे.
”मी कधीच प्रेग्नंट होऊ शकत नाही”, ड्रामा क्वीन राखी सावंतनं स्वतः सांगितलं कारण
सुबोध खानोलकर यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. दिलीप प्रभावळकर यांच्यासह या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल आणि कोकणातील अनेक स्थानिक कलाकार झळकले आहेत.
‘दशावतार’चे लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून, गुरू ठाकूर यांनी संवाद व गीतलेखन केले आहे. ए.व्ही. प्रफुलचंद्र यांच्या लक्षवेधी संगीताने चित्रपटाला विशेष रंगत आणली आहे. या सिनेमाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे आणि सुबोध खानोलकर यांनी संयुक्तपणे केली आहे.






