पोल्ट्री उद्योगातून शेतकऱ्याची भरारी; वर्षाला करतोय १५ कोटीहून अधिकचा टर्नओव्हर!
राज्यात शेतकऱ्यांना एकवेळ अशी होती. ज्यावेळी रोजंदारीने कामावर जावे लागत होते. मात्र, आता शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर शेतीमधून मोठी आर्थिक कमाई करत आहे. विशेष म्हणजे हे शेतकरी केवळ मोठी कमाईच करत नाहीये. तर आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी देखील ठरत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे ऑटोमेटिक पोल्ट्री फार्म उभारत, वर्षाला कोट्यवधींची कमाई करत आहे. इतकेच त्यांनी आपल्याकडे ५० जणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
100 कोंबडी पालनातून सुरुवात
रविंद्र मेटकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. रवींद्र यांचे वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. आपल्या वडिलांना कुटुंब चालवताना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पोल्ट्री उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कुटुंबाने देखील त्यांना त्यात साथ दिली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांनी दिलेल्या ३० हजारांच्या रकमेतून, त्यांनी 100 कोंबडी पालनातून पोल्ट्री उद्योगाला सुरुवात केली होती. आज त्यांनी पोल्ट्री उद्योगातून कोट्यवधींच्या कमाईसह ५० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
लाखोंच्या कोंबडी पालनाची क्षमता असलेले फॉर्म
मात्र, आज शेतकरी रवींद्र मेटकर यांनी 50,000 कोंबड्यांची क्षमता असलेले एक ऑटोमेटिक पोल्ट्री फार्म उभारले आहे. ज्यासाठी त्यांना तब्बल १८ लाखांचा खर्च आला आहे. याशिवाय त्यांच्याकडे आज 1.3 लाख कोंबड्याची क्षमता असलेले आणखी एक पोल्ट्री फार्म उभारले आहे. ज्याद्वारे ते महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये अंड्यांचा पुरवठा करतात. त्यांचे पोल्ट्री उद्योगातील यश पाहता केंद्र सरकारकडून देखील त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लेक्चर देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
वार्षिक १५ कोटींहून अधिक टर्नओव्हर
सुरुवातीला अधिकची जमीन घेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नव्हते. मात्र, त्यांच्या आईला माहेरची जमीन मिळाली होती. ही जमीन विकून रवींद्र यांनी आपल्या गावातच वाढीव जमीन घेतली. विशेष म्हणजे पोल्ट्री उद्योगासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज देखील घेतले होते. पाहता पाहता त्यांच्या १०० कोंबड्यांपासून झालेली सुरुवात आज लाखोंच्या संख्येपर्यंत पोहचली आहे. त्यांना सध्याच्या घडीला पोल्ट्री उद्योग चालवण्यासाठी दररोज ४ हजारांचा खर्च येतो. तर त्यातून त्यांना वार्षिक १५ कोटींहून अधिक टर्नओव्हर होत असल्याचे ते सांगतात.