पुण्यात किमान तापमानात वाढ (फोटो- istockphoto)
पुण्यात किमान तापमानात वाढ
ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता
पुणे: पुणे शहरात गेल्या २४ तासांत किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, शहरातील थंडी ओसरली आहे. मंगळवारी किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. तर पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे शहरातील उकाड्यात वाढ कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १८) १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडले होते. संध्याकाळी सामान्यतः ढगाळ वातावरण होते. तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. १९) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २०) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार असून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
तापमानातील चढउतार आणि ढगाळ वातावरण अशा बदलाबाबत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘सोमवारी रात्रीपासून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच रात्री ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे जमीनीकडून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणातच रोखली गेली. यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू लागला आहे. प्रामुख्याने दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तापमानातील ही तफावत सरासरीपेक्षा सुमारे २ अंशांनी अधिक आहे. तापमानातील हे बदल या दिवसांमध्ये नैसर्गिक असून सरासरीच्या तुलनेत त्यात फार मोठी तफावत नाही.’’
“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
भारतात पुन्हा पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.






