फोटो सौजन्य - Social Media
कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या भूमिका मांडल्या आहेत. पुढील काही वर्षांमध्ये भारत देश अर्थामध्ये फार उज्वल होण्याच्या दिशेने असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या देशाचा प्रति व्यक्ती उत्पन्न $2,730 आहे. पुढील पाच वर्षांमध्ये यात $2000 ने वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसचे देशातील सामान्य लोकांचे जीवनमानात या दशकात अनेक बदल घडून येण्याचे सांगितले आहे. एकंदरीत, बदलती जीवनशैली देशातील सामान्य कुटुंबाच्या अर्थवार परिणाम घडवून आणणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. या भाष्यादरम्यान, त्यांनी गेल्या पाच वर्षातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे.
हे देखील वाचा : 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार – मोदी
कौटिल्य आर्थिक परिषदेत सगळ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या कि, गेल्या पाच वर्षांत भारताने 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि या कालावधीत उच्च आर्थिक वाढ कायम राखली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि, देशाला वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले आहे. उत्पन्न असमानतेचे मोजमाप करण्यासाठी संशोधनात प्राप्त झालेले जीनी गुणांक देशातील ग्रामदिन क्षेत्रामध्ये 0.283 वरून 0.266 वर घसरला आहे. तर शरि भागामध्ये याचे प्रमाण 0.363 वरून 0.314 वर घसरून आले आहे. तसेच या भाष्यादरम्यान, त्यांनी भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयी सूचित केले आहे. तसेच सगळ्यांना सावध होण्यास सांगितले आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताची आर्थिक वाढ जरी पुढे सुरू राहणार असली तरी जागतिक परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होतील. भारताला आपल्या देशांतर्गत क्षमता वाढवून शाश्वत विकास साधावा लागेल. तसेच, त्यांनी युवा लोकसंख्येच्या महत्त्वावर जोर देत सांगितले की, या दशकात देशाला प्रगतीसाठी युवा पिढी महत्त्वाची ठरेल.
हे देखील वाचा :रतन टाटांनी ‘या’ कंपनीतून कमावला 23 हजार टक्के नफा; आता कमी केली हिस्सेदारी!
भारतामध्ये युवा लोकांख्या अफाट आहे. २४ वर्षांखाली आयु असलेले उमेदवारांचे देशातील लोकसंख्येचे प्रमाण ४३% आहे. भविष्यात खरेदी वाढवण्यासाठी ही पिढी फार महत्वाची ठरणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. काही वर्षांमध्ये ही पिढी आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सक्रिय होईल आणि याच देशाच्या अर्थव्यवस्थेला अफाट फायदे होणार असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे.