25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार - मोदी
देशभरात सध्या बदलाची लाट पाहायला मिळत आहे. देश सध्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहे. आर्थिक सुधारणांद्वारे देशात केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण झाले. असे नाही तर या सुधारणांद्वारे सुमारे 25 कोटी नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास मदत झाली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.४) सांगितले आहे. ते कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना बोलत होते. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील उपस्थित होत्या.
हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!
नवीन 5 सेमीकंडक्टर प्लांट उभारले जाणार
भारतात लवकरच नवीन 5 सेमीकंडक्टर प्लांट उभारले जाणार आहे. सेमीकंडक्टर चिप्स भारतात बनवून संपूर्ण जगाला पुरवल्या जातील. या मेड इन इंडिया चिप्सचा भारतासह संपूर्ण जगाला फायदा होईल. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहे. सर्व प्रकारच्या धोरणात्मक सुधारणा करून, आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देत आहोत. नव्याने 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून, आम्ही कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत में growth के साथ inclusion भी हो रहा है। pic.twitter.com/o9ZYz9zDAW — PMO India (@PMOIndia) October 4, 2024
25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले
भारताच्या आर्थिक प्रगतीसोबतच आपण सर्वांना बरोबर घेऊन जात आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या 10 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आपण सुधारणांच्या मार्गावर पुढे जात राहू. आमचे सरकार सुधारणा करा आणि परिवर्तन करा. या मंत्रांचे पालन करून देशासाठी प्रभावी निर्णय घेत राहील. आम्ही देशाला वेगाने पुढे नेत राहू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारताचा जीडीपी जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.