देशात पहिल्यांदाच धावणार बेबी मेट्रो
नागपूरमधील मेट्रो प्रकल्प टप्पा 2 दोनसंबंधी एक महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे ज्यामुळे प्रकल्पाला प्रचंड गती मिळणार आहे. आशियाई विकास बँकेकडून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी तब्बल 1527 कोटी रुपयांचे (200 मिलियन डॉलर) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमधील विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात आज ( दि. 17 डिसेंबर 2024) रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नागपूर शहर आणि परिसराच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक (ADB) तसेच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण 3586 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. त्यापैकी 1527 कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून दिले जाणार असून त्यासंदर्भातील करार आज केला गेला आहे. महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. येन मध्ये वित्तपुरवठा केला जात असल्याने या कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महा मेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-2
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-2 हा खापरी ते एमआयडीसी ईएसआर दरम्यान 18.5 किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान 13 किलोमीटर,लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान 6.7 किलोमीटर आणि प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान 5.6 किलोमीटर असणार आहे. एकूण 43.8 किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील 10 लाख रहिवाशांना होणार आहे.
नागपूर मेट्रो टप्पा 2 चा तपशीलवार प्रकल्प अहवाल हा (DPR) RITES द्वारे तयार करण्यात आला. या प्रकल्पाला जानेवारी 2019 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली त्यावेळी या प्रकल्पाची अंदाजे किमंत ही रुपये 5976 कोटी होती. आणि त्याची अंदाजे किंमत रु. 5,976 कोटी. एप्रिल 2023 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने 6708 कोटींच्या सुधारित अंदाजित खर्चासह प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
नागपूर मेट्रो टप्पा 2 ला आशियाई विकास बँक (ADB) द्वारे जुलै 2024 मध्ये USD 200 दशलक्ष (अंदाजे रु. 1678 कोटी) कर्जाला मंजूरी दिली होती. या नागपूर मेट्रो 2 प्रकल्पाची पायाभरणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली आहे. आता या सामंजस्य करारामुळे या प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पाची अंतिम मूदत ही 2026 आहे. त्यामुळे पुढील 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महा मेट्रो समोर असणार आहे.