फोटो सौजन्य- iStock
कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना ती सुरक्षित असावी आणि त्याचा जास्तीजास्त परतावा मिळावा हे दोन प्रमुख मुद्दे समोर ठेऊनच गुंतवणूक केली जाते. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना या दोन्ही मुद्द्यांमुळे लोकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद लाभला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये देशातील करोडो लोकांनी गुतंवणूक केली आहे. त्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात प्रभावी ठरणारी स्किम आहे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( SCSS). या योजनेतील गुंतवणूक ही ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता आणि उत्तम परतावा देते त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान होते. जाणून घेऊया या योजनेबद्दल आणि त्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांबद्दल
पोस्टाकडून 2004 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुरु करण्यात आली. ही योजनाना 60 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी आहे. सध्या या योजनेवर मिळणारा व्याजदर हा तब्बल 8.2 टक्के इतका आहे.रक्कमेवर मिळत असलेला हा व्याजदर अलीकडच्या काळात देऊ केलेल्या उच्च परताव्याच्या लहान बचत योजनांपैकी एक योजना बनवतो.
योजनेचे वैशिष्ट्ये
ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी त्याचा कालावधी ठरवतात. तेव्हा असलेला व्याजदर गुंतवणुकीवर योजनेच्या कालावधी पूर्ण होईपर्यंत स्थिर राहतो तो बदलत नाही हे या योजनेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच योजनेच्या 8.2 टक्के असलेल्या व्याजदरासोबतच कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील या योजनेमध्ये उपलब्ध आहे. तीन महिन्याच्या अतंराने व्याज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते.
योजनेच्या गुंतवणुकीची रक्कम
राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक बचत योजने Senior citizen saving scheme अंतर्गत गुंतवणुकदार हे किमान 1,000 रुपये ते 30 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.
योजनेचा कालावधी
ज्येष्ठ नागरिक बचत योजना कालावधी हा पाच वर्षाचा आहे. यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षाची एकच मुदतवाढही दिली जाते. आयकर विभाग, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी SCSS करसवलत आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खाते कसे उघडायचे?
देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडू शकता. या योजनेसाठी खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागेल आणि तो केवायसी कागदपत्रांच्या प्रतीसह सबमिट करावा लागेल. कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासह 2 पासपोर्ट आकाराचे फोटो यांचा समावेश होतो.
पोस्टाच्या या योजनेमध्ये देशातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना या योजनेद्वारे उत्तम व्याज परतावा मिळत आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे. त्यांनी तात्काळ नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेसाठी फॉर्म भरावा.