जानेवारी महिन्यात इतके दिवस राहतील बॅंका बंद; वाचा... सुट्ट्यांची संपुर्ण यादी!
तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने, बॅंकांमधील काम म्हटले की अनेक जण नाक मुरडतात. याशिवाय अनेकांना बॅंकांना असलेल्या सुट्टयांबाबत माहिती नसल्याने, मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता, येत्या ऑक्टोबर महिन्यात बॅंकांना तब्बल १५ दिवस सुट्टया असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील पुढील महिन्यात बॅंकांच्या संंबंधित काम करण्याचा विचारात असाल तर बॅंकाँना पुढील महिन्यात असलेल्या सुट्टयांची माहिती घेऊनच आपल्या कामाची आखणी करावी.
31 दिवसांपैकी सुमारे 15 दिवस सुट्या असणार
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) दर महिन्याच्या सुरूवातीस बँक सुट्टीची यादी प्रसिद्ध करते. या यादीनुसार, ऑक्टोबरमध्ये 31 दिवसांपैकी सुमारे 15 दिवस सुट्या असतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह सणासुदीचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळे ऑक्टोबरमध्ये बँक एक दिवस बंद राहणार आहे. गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा, काटीबिहू आणि दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या असतील.
ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?
1 ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर – गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
3 ऑक्टोबर – जयपूरमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेमुळे बँकांना सुट्टी असेल.
6 ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.
10 ऑक्टोबर – आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद राहतील.
11 ऑक्टोबर – आगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग येथे दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमीमुळे बँक सुट्टी राहील.
12 ऑक्टोबर – दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा यामुळे देशभरातील बँका जवळपास बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
14 ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गापूजा किंवा दसेननिमित्त बँकांना सुट्टी असेल.
16 ऑक्टोबर – लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आगरतळा आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.
17 ऑक्टोबर – महर्षि वाल्मिकी जयंती आणि कांती बिहू या दिवशी बंगळुरू आणि गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
26 ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
27, ऑक्टोबर – रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
31 ऑक्टोबर – दिवाळीनिमित्त जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे.
युपीआय आणि नेट बँकिंग सुरु राहणार
ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामामुळे देशातील अनेक राज्यांतील बँकांना वेगवेगळ्या सणांच्या दिवशी सुट्या असतात, मात्र त्यानंतरही तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम थांबणार नाही. बँकेची सुट्टी असली तरी व्यवहार करण्यासाठी तुम्ही युपीआय, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकता. याशिवाय एटीएममधूनही पैसे काढता येतात.