व्हिजन 2030 ग्रोथ स्ट्रॅटेजीसाठी रिलायन्स ग्रुपकडून ‘रिलायन्स ग्रुप कॉर्पोरेट सेंटर’ची स्थापना
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीला अच्छे दिन आले आहेत. कंपनीचे शेअर्स गेल्या 8 दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर कायम आहेत. याच क्रमवारीत, शेअर्समध्ये आज (ता.२७) देखील 5 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यानंतर शेअरची किंमत 46.36 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे ती 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर पाहायला मिळत आहे. त्याच वेळी गेल्या आठ ट्रेडिंग दिवसांमध्ये शेअर्सने एकूण 46.6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
इक्विटी स्टेक 600 कोटी रुपयांनी वाढवणार
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या मंडळाने सोमवारी (ता.२७) 46.2 कोटी इक्विटी शेअर्स आणि प्राधान्य वाटपाद्वारे 1,525 कोटी रुपयांचे वॉरंट जारी करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनी प्रवर्तक रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आपले इक्विटी स्टेक 600 कोटी रुपयांनी वाढवणार आहे. प्रेफरेंशियल शेअर्समध्ये सहभागी होणाऱ्या इतर गुंतवणूकदारांमध्ये ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि सनातन फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचाही समावेश आहे.
हे देखील वाचा – शेअर बाजारातील हालचालींबाबत राहुल गांधींची ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट; म्हणाले…
रिलायन्स पॉवरच्या शेअर पुन्हा सावरला
रिलायन्स पॉवरने सीएफएम मालमत्ता पुनर्बांधणीसाठी 3,872.04 कोटी रुपयांच्या दायित्वांची पुर्तता केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही कंपनी चांगलीच प्रसिद्धी झोतात आली होती. त्यावेळी, रिलायन्स होम फायनान्समधील निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सेबीने अनिल अंबानी यांना रोखे बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर, रिलायन्स पॉवरच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, आता रिलायन्स पॉवरच्या शेअर पुन्हा सावरला आहे.
वर्षभरात 141.6 टक्के मल्टीबॅगर परतावा
रिलायन्स पॉवरच्या समभागांनी गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 141.6 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर शेअर्सने वार्षिक आधारावर 93.6 टक्के वाढीनंतर दुप्पट वाढ केली आहे. कंपनीच्या शेअरच्या दमदार कामगिरीमुळे कंपनीचे मार्केट कॅप तब्बल १८ हजार ६२० कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीने शेअर बाजारात आपला स्थान अधोरेखित केले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)