अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
भारतीय शेअर बाजाराच्या आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना आजचा दिवस काहीसा संमिश्र असा पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी (ता.१३) शेअर बाजार बंद झाला, त्यावेळी बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स सुमारे 850 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. तर आजच्या व्यवहारात, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी देखील खालच्या स्तरावरून 611 अंकांनी उसळला आहे. सेन्सेक्सच्या खालच्या स्तरावरून 2000 अंकांची झेप घेतल्याने बाजारात उत्साह संचारला होता.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील मजबूतीमुळे, बिअर ट्रेंडने पहिल्या सहामाहीत बाजाराला आनंद दिला आहे. दुसऱ्या सहामाहीत तेजीने बाजाराला आनंदी राहण्याची संधी दिली आहे. निफ्टी बँक 400 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद होताना दिसत आहे. एनएसईच्या वाढत्या आणि घसरलेल्या शेअर्सपैकी 1004 शेअर्स वाढले आणि 1406 शेअर्स घसरून ट्रेडिंग बंद झाले आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार – फडणवीस
शुक्रवारी शेअर बाजार कसा होता?
शुक्रवारी (ता.१३) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 843.16 अंकांच्या किंवा 1.04 टक्क्यांच्या वाढीसह 82,133.12 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 219.60 अंकांच्या किंवा 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 24,768.30 च्या पातळीवर बंद झाला आहे.
सेन्सेक्सची खालच्या पातळीवरून 2000 अंकांची झेप
आज दिवसाचा निच्चांक पाहिल्यास सेन्सेक्समध्ये दिवसाच्या व्यवहारात २११० अंकांची उसळी दिसून आली आहे. याशिवाय दिवसभर सेन्सेक्समध्ये जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्सच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना आनंदाची संधी मिळाली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून 754 कोटींच्या कामाची ऑर्डर, ‘या’ शेअर्सद्वारे वर्षभरात 400 टक्क्यांचा परतावा!
सेन्सेक्स समभागांमध्ये काय होता लेखाजोखा?
सेन्सेक्स समभागांमध्ये भारती एअरटेल, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, एचयूएल, टायटन, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभाग वाढीसह बंद झाले आहे. केवळ 4 समभाग घसरणीसह बंद झाले आहे. टाटा स्टील, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स घसरणीला लागले आहेत.
बीएसईचे मार्केट कॅपिटलायझेशन
बीएसईचे बाजार भांडवल 459.40 लाख कोटी रुपये आहे आणि त्यात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 4105 शेअर्समध्ये व्यवहार बंद झाला. यातील 1827 शेअर्समध्ये वाढ तर 2165 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आणि 113 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार बंद झाला आहे. शेअर बाजार आता सोमवारी नव्या ट्रेडिंग सत्रासाठी उघडणार आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)