गुंतवणुकीत मोठा विक्रम! HDFC पेन्शनच्या AUM मध्ये विक्रमी २००% वाढ
विकासाची गती आणि बाजारपेठेतील स्थान
एचडीएफसी पेन्शनच्या नेतृत्वाची गती विविध उल्लेखनीय टप्प्यांतून दिसून येते. कंपनीचा AUM आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील ₹६ कोटींवरून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ₹१,५०,००० कोटींपर्यंत वाढला आहे. कंपनीने AUM संदर्भात ४३% चा मोठा मार्केट शेअर संपादित करत, उत्कृष्ट कामगिरी आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आपली प्रबळ कटिबद्धता दाखवली आहे. सध्या, कंपनी २७ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे, ज्यांनी त्यांचा निवृत्ती निधी एचडीएफसी पेन्शनमध्ये गुंतवला आहे.
कॉर्पोरेट आणि वितरण सहकार्य
एचडीएफसी पेन्शनने आपल्या ‘पॉईंट ऑफ प्रेझन्स (POP)’ परवान्याच्या माध्यमातून NPS च्या स्वीकृतीला सक्रियपणे चालना दिली आहे. कंपनीने स्वतःला सर्वात मोठी ‘कॉर्पोरेट NPS POP’ म्हणून स्थापित केले आहे आणि ४,३०० हून अधिक कॉर्पोरेट्ससोबत सहयोग केला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी कॉर्पोरेट NPS अंतर्गत नोंदणी करणे सुलभ झाले आहे.
व्यवस्थापकीय संचालक (MD) व सीईओ यांचे मत
या उपलब्धीबद्दल मत व्यक्त करताना एचडीएफसी पेन्शनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीराम अय्यर म्हणाले.
“एचडीएफसी पेन्शनमध्ये आमच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामधून आमच्या उत्पादनावर, तसेच एचडीएफसी पेन्शनवर ग्राहकांचा विश्वास दिसून येतो. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या कॉर्पोरेट आणि वितरण सहयोगींचे समर्थन व पाठिंब्यामुळे हा टप्पा शक्य झाला आहे.”
ते पुढे म्हणाले की, NPS हे उत्पादन भारतीयांसाठी त्यांच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. कंपनीच्या नवीन योजना ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.
निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन
प्रत्येक व्यक्तीने निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेच्या खात्रीसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. NPS मोठ्या प्रमाणात निवृत्ती निधी उभारण्यासाठी कमी-खर्चिक, स्थिर, शिस्तबद्ध आणि कर-कार्यक्षम दृष्टिकोन देते. हे उत्पादन पगारदार, स्वयं-रोजगारित व्यक्ती, गिग कर्मचारी आणि अल्पवयीन मुलांना (त्यांच्या पालकांच्या माध्यमातून) देखील निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन करण्याची सेवा देते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) ने नुकतेच प्रमुख सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यामुळे NPS अधिक लक्षवेधक बनले आहे.
हे देखील वाचा: Rupee Vs Dollar: रुपया विक्रमी निचांकी पातळीवर! 1 डॉलर 90 रुपयांवर, कारण काय?






