फोटो सौजन्य: iStock
महाराष्ट्रात नेहमीच अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसतात. सध्या ईव्हीच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सरकार सुद्धा ग्रीन एनर्जीबाबत सकारात्मक पाऊले उचलताना दिसत आहे. आता महाराष्ट्रात ईव्ही ट्रकच्या उत्पादनासाठी एका कंपनीने तब्बल ३५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे राज्यात ४००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
ब्लू एनर्जी मोटर्स लि. या एस्सारच्या ग्रीन मोबिलिटी उपक्रमामधील सहयोगी आणि क्लीन-एनर्जी ट्रक्समधील अग्रणी कंपनीने डॅव्होसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारासह राज्यामध्ये ब्लू एनर्जी मोटर्स लि.च्या प्रस्तावित गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे, जेथे ३०,००० ईव्ही ट्रक्स उत्पादित करण्याची योजना आहे. या उपक्रमाचा औद्योगिक विकासाला चालना देण्याचा आणि प्रांतातील ईव्ही ट्रक उत्पादन पायाभूत सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा मनसुबा आहे.
अखेर नारायण मूर्ती नरमले! 70 तास कामाच्या विधानावरून दिलं स्पष्टीकरण
या सामंजस्य कराराच्या अटीअंतर्गत ब्लू एनर्जी मोटर्स अत्याधुनिक उत्पादन केंद्र स्थापित करण्यासाठी महाराष्ट्रात जवळपास ३५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करेल. हे केंद्र कंपनीचे प्रगत इलेक्ट्रिक (ईव्ही) ट्रक्स उत्पादित करण्याप्रती समर्पित असेल. या केंद्रामध्ये प्रगत आरअँडडी क्षमता, बॅटरी-पॅक लाइन, मोटर उत्पादन युनिट असेल, तसेच चार्जिंग स्टेशन्स देखील उभारेल. या गुंतवणूकीसह ४,००० हून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्याचे हरित ऊर्जा परिवर्तन व आर्थिक विकासाप्रती योगदान मिळेल. प्रस्तावित प्रकल्प आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत ब्लू एनर्जी मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध भुवाल्का म्हणाले, ”आम्हाला महाराष्ट्र सरकारसोबत या महत्त्वपूर्ण सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग एस्सारच्या ग्रीन मोबिलिटी उपक्रमासोबत सहयोगाने हरित ट्रकिंगमध्ये अग्रणी असण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. यामधून शुद्ध, हरित व अधिक शाश्वत भविष्याप्रती आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. आमची गुंतवणूक प्रगत शुद्ध गतीशीलता सोल्यूशन्ससाठी महाराष्ट्राचे जागतिक हब म्हणून स्थान अधिक दृढ करेल, तसेच रोजगार निर्मिती व आर्थिक विकासाप्रती देखील योगदान देईल.”
एस्सार रिन्युएबल्स महाराष्ट्र शासनाशी करार; 2 GW नवीकरणीय ऊर्जा करणार विकसित
नवीन इंटर-कनेक्टेड केंद्र शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्सचे उत्पादन करण्यासाठी उद्योग-अग्रणी उत्पादन पद्धतींची अंमलबजावणी करेल. या एआय व एमएल सक्षम ईव्ही कमर्शियल वेईकल्स अद्वितीय कार्यक्षमता व विश्वसनीयता देत, तसेच कार्बन फूटप्रिंट्स मोठ्या प्रमाणात कमी करत हेवी-ड्युटी ट्रकिंगला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम प्रमुख लीडर्स व भागधारकांसोबत सहयोग करत कंपनीला हरित ट्रकिंग सोल्यूशन्समधील लीडर म्हणून स्थापित करण्याच्या आमच्या मिशनशी संलग्न आहे, जेथे हवामान बदल व शाश्वत विकास अशा जागतिक आव्हानांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.