केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट एका क्लिकवर (फोटो सौजन्य- X)
Union Budget 2025-26 India, FM Nirmala Sitharaman Speech Today in Marathi LIVE Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (१ फेब्रुवारी २०२५) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी ३.० नंतरचा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे . यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, २३ जुलै २०२४ रोजी, सरकारने त्यांचे पहिले सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. याआधी मोरारजी देसाई यांनी सलग ६ अर्थसंकल्प सादर केले होते. देशाचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता संसदेत मांडला जात असून जगभरातील वाढती महागाई आणि मंदीचा धोका पाहता, सर्वांच्या नजरा भारताच्या अर्थसंकल्पावर आहेत. देशाच्या अर्थसंकल्पातील प्रत्येक घडामोडींसाठी हा ब्लॉग वाचत रहा…
01 Feb 2025 03:14 PM (IST)
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे अर्थसंकल्प गुंतवणूक आणेल. हे बजेट जनतेचे आहे. हे जनतेचे बजेट आहे. यासाठी मी निर्मला सीतारमण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देश विकास आणि वारशाने पुढे जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वत्र रोजगार निर्माण करणारा आहे. या अर्थसंकल्पात पर्यटनातून रोजगार निर्माण केला जाईल.
01 Feb 2025 02:25 PM (IST)
शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पावर, ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यांची नावे सर्वात जास्त बिहार आणि त्यानंतर आसाम अशी आहेत. किमान आधारभूत किमतीच्या हमीसाठी शेतकरी संपावर असलेल्या पंजाबचे नावही घेतलेले नाही. शेतकऱ्यांचा लढा अजिबात ऐकला गेला नाही, म्हणूनच मी दुःखी आहे.
01 Feb 2025 01:25 PM (IST)
राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प गाव, ग्रामीण आणि गरीब विरोधी आहे. ते म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प बिहारची थट्टा आहे. सावत्र आईची वागणूक देण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पातील मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे. ते म्हणाले की बिहारला कोणताही फायदा झालेला नाही. हे बजेट म्हणजे फक्त पोकळ भाषण आणि पोकळ भाषण आहे. ते म्हणाले की, रेल्वेचे भाडे महाग होत आहे आणि कुठेही दिलासा मिळत नाही. पूर्वी जेव्हा अर्थसंकल्प येत असे तेव्हा रेल्वे अर्थसंकल्प वेगळा असायचा.
01 Feb 2025 01:25 PM (IST)
भाजपने आपल्या सर्व खासदारांना सांगितले की, हा अर्थसंकल्प सामान्य माणूस, मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी आहे; तो समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा आणि मोदी सरकारने दिलेल्या मदतीबद्दल त्यांना सांगा. याशिवाय, दिल्लीतील ज्या खासदारांना विधानसभा आणि विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी दिल्लीतील जनतेला विशेषतः हे सांगावे की या अर्थसंकल्पात दिल्लीतील लोकांसाठी, विशेषतः मध्यमवर्गीय, गरीब, महिला आणि इतरांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
01 Feb 2025 12:56 PM (IST)
४ लाख रुपयांपर्यंत ०%, ४-८ लाख: ५% , ८-१२ लाख: १०% , १२-१६ लाख: १५% , १६-२० लाख: २०% , २०-२४ लाख: २५% , २४ लाख रुपयांपेक्षा जास्त: ३०%
Budget 2025 : करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा; १२ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त
01 Feb 2025 12:35 PM (IST)
आयकराबद्दल सरकारची घोषणा
01 Feb 2025 12:25 PM (IST)
१२ लाख ते १६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५% कर आकारला जाईल.
01 Feb 2025 12:17 PM (IST)
12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 80 हजारांपर्यंत फायदा होणार आहे.
01 Feb 2025 12:14 PM (IST)
12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आली आहे. नव्या करप्रणालीत मोठे बदल करण्यात आले.
01 Feb 2025 12:11 PM (IST)
स्टार्टअपसाठी दिलेल्या सुविधा 5 वर्षांनी वाढवण्यात आल्या आहेत.
01 Feb 2025 12:10 PM (IST)
रिटर्न न भरलेल्यांसाठी मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली.
01 Feb 2025 12:08 PM (IST)
टीडीएसमधील घरभाड्याची मर्यादा वाढवण्यात आली
01 Feb 2025 12:07 PM (IST)
मध्यमवर्गासाठी आयकर सुधारणा करण्यात आली.
01 Feb 2025 12:03 PM (IST)
टिव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार असून फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील कर 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात येणार आहे.
01 Feb 2025 12:02 PM (IST)
लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार आहेत.
01 Feb 2025 12:00 PM (IST)
मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम्स ड्युटी हटवण्यात आली आहे.
01 Feb 2025 11:59 AM (IST)
82 गोष्टींवरून सोशल वेल्फेअर सरचार्ज हटवला असून 36 महत्त्वाची औषध कस्टम्स ड्युटीतून वगळण्यात आली आहे.
01 Feb 2025 11:57 AM (IST)
7 टॅरिफ रेट्स हटवण्यात आल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
01 Feb 2025 11:56 AM (IST)
विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे.
01 Feb 2025 11:55 AM (IST)
जन विश्वास विधेयक आणणार आहेत.
01 Feb 2025 11:53 AM (IST)
कंपन्यांचं एकत्रीकरण सुलभ करण्यात येणार आहेत.
01 Feb 2025 11:52 AM (IST)
शेतीमाल निर्यातदारांसाठी कार्गो सिस्टीम युझर फ्रेंडली योजना सुरु करण्यात आली.
01 Feb 2025 11:49 AM (IST)
2025 मध्ये आणखी 40 हजार नागरिकाचं गृहस्वप्न पूर्ण करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
01 Feb 2025 11:47 AM (IST)
उडान योजना नव्याने स्थापन करण्यात येणार असून पुढील 10 वर्षात 120 नवी ठिकाणे जोडणार आहेत.
01 Feb 2025 11:45 AM (IST)
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दस्तावेजांसाठी नवे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.
01 Feb 2025 11:44 AM (IST)
50 नवी पर्यटन स्थळ विकसित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.
01 Feb 2025 11:43 AM (IST)
पुरातन हस्तलिखितांचं संवर्धन करण्यात येणार आहे.
01 Feb 2025 11:41 AM (IST)
कृषी, आरोग्य इनोव्हेशनमध्ये एआय असणार आहे. तसेच AI च्या अभ्यासासाठी तीन केंद्र असणार आहेत.
01 Feb 2025 11:39 AM (IST)
आयआयटींची क्षमता वाढवली असून 6500 जागा वाढवल्या असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
01 Feb 2025 11:37 AM (IST)
वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी 5 वर्षांचा कार्यक्रम, अर्थमंत्र्यांची घोषणा
01 Feb 2025 11:36 AM (IST)
भारतीय भाषांमधील पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार आहेत.
01 Feb 2025 11:35 AM (IST)
सामान्य, अर्थव्यवस्था नाविन्यात गुंतवणूक करणार असल्याचे अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.
01 Feb 2025 11:33 AM (IST)
पूर्वोत्तर राज्यांत अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असून उत्पादकता वाढीसाठी नॅशनल मॅन्यूफॅक्चरिंग मिशन
01 Feb 2025 11:32 AM (IST)
भारतीय संस्कृती दाखवणारी उत्तम खेळणी तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
01 Feb 2025 11:30 AM (IST)
चामड्याची पादत्राणं बनवणाऱ्यांसाठी विशेष योजनेची अर्थमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली.
01 Feb 2025 11:29 AM (IST)
महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार असून या योजनेचा 5 लाख महिलांना लाभ होणार आहे.
01 Feb 2025 11:27 AM (IST)
एमएसएमईला सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणार असून MSME ला 20 कोटींपर्यंतच टर्म कर्ज घेता येणार आहे.
01 Feb 2025 11:25 AM (IST)
स्टार्टअप्ससाठी 10 कोटींवरून 20 कोटींची क्रेडीट लिमीट करण्यात आलं आहे.
01 Feb 2025 11:24 AM (IST)
लघुउद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
01 Feb 2025 11:22 AM (IST)
इंडिया पोस्ट महिला बँकेचं पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे.
01 Feb 2025 11:20 AM (IST)
60 कोटी रुपयांची देशाची मत्स्यनिर्यात करण्यात येणार असून, कृषी योजनेत 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
01 Feb 2025 11:17 AM (IST)
कृषी योजनेत शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणार असून बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
01 Feb 2025 11:16 AM (IST)
पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवणार आहेत. उत्पादन वाढवणं, प्रक्रिया ,वितरण यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.
01 Feb 2025 11:13 AM (IST)
डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांकडून घेण्यात आला आहे.
01 Feb 2025 11:11 AM (IST)
योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष्य, तसेच 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार असल्याचे अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं.
01 Feb 2025 11:09 AM (IST)
विकासाच्या वाटचालीत चार महत्त्वाचे स्तंभ, सब का विकास हेच आमचं उद्दीष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटलं.
01 Feb 2025 11:07 AM (IST)
उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर देणार असल्याचे यावेळी अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
01 Feb 2025 11:06 AM (IST)
देश म्हणजे केवळ जमीन नाही तर देश म्हणजे जनता आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था वेगवान असल्याचं यावेळी अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
01 Feb 2025 11:03 AM (IST)
अर्थसंकल्पाचं लोकसभेत वाचन अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडून सुरू करण्यात आलं आहे.
01 Feb 2025 10:27 AM (IST)
अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली.