एचडीएफसीकडून क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; 1 ऑगस्टपासून लागू होणार नवीन नियम!
एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेकडून आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे आता बँकेच्या क्रेडिट कार्ड चार्जमध्ये देखील बदल पाहायला मिळणार आहे. हे नवीन नियम प्रामुख्याने १ ऑगस्ट २०२४ रोजी लागू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण एचडीएफसी बँकेकडून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काय-काय बदल करण्यात आले आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
१ टक्के शुल्क आकारले जाणार
एचडीएफसी बँकेच्या नवीन नियमानुसार, खातेधारकांना आता क्रेडिड चेक, मोबिक्विक, फ्रीचार्जे या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना व्यवहारावर १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. ग्राहकांना यासाठी प्रति व्यवहाराची मर्यादा घालून देण्यात आली आहे. बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नवीन नियमांतील बदलांमुळे ग्राहक यापुढे ३००० रुपयांचे व्यवहार हे एकावेळी करु शकणार आहेत.
(फोटो सौजन्य : istock)
इंधनासाठी केले जाणारे व्यवहार
एचडीएफसी बँकेच्या नवीन नियमानुसार, आता ग्राहकांना १५ हजारांपेक्षा कमी व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तर १५ हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारावर ग्राहकांना १ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. प्रामुख्याने ग्राहकांना इंधन खरेदीवर हे शुल्क द्यावे लागणार आहे. याउलट तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी करत असलेल्या ५०,००० पेक्षा कमी किमतीच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क आकाराले जाणार नाही. तर तुम्हाला ५० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या तुमच्या व्यवहारावर १ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. असेही एचडीएफसी बँकेकडून नवीन नियमांबाबत सांगण्यात आले आहे.
कसे असेल शिक्षणासाठीचे व्यवहारांचे स्वरूप?
विद्यार्थ्यांचा शुल्क भरणा करताना पालकांनी महाविद्यालय किंवा शाळा यांच्या संकेतस्थळाद्वारे थेट पेमेंटचा भरणा केल्यास त्यांना त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. याउलट पालकांनी आपल्या पाल्याच्या फीचा भरणा वेगवेगळ्या अँपवरून केला असेल तर त्यांना त्या व्यवहारावर १ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे.
याशिवाय एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले आहे की, सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा क्रॉस करन्सी व्यवहारांवर ३.५ टक्के मार्कअर शुल्क लागू असणार आहे. तर बँकेचा ग्राहक कोणत्याही प्रकारचा ईएमआय भरत असेल तर अशा ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करणाऱ्यासाठी २९९ रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.