Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्….

देशात इंधन दरवाढ आणि डिझेल टंचाईमुळे ६० लाख व्यावसायिक वाहने जागच्या जागी ठप्प झाली आहेत. यामुळे देशाचे दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान होत असून पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 05:40 PM
देशात डिझेल टंचाईचा हाहाकार (Photo Credit- X)

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • देशात डिझेल टंचाईचा हाहाकार!
  • ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प
  • दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन् वाहतूक व्यवस्था कोलमडली
Diesel Shortage Commercial Vehicles News: इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि देशातील निवडक पेट्रोल पंपांवर सुरू असलेला डिझेलचा तुटवडा यामुळे मालवाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. डिझेल न मिळाल्यामुळे देशातील तब्बल ४० टक्के म्हणजेच सुमारे ६० लाख व्यावसायिक वाहने रस्त्यांच्या कडेला उभी राहिली आहेत. या अभूतपूर्व संकटामुळे वाहतूक क्षेत्राचे दररोज २१ अब्ज रुपयांचे (२१०० कोटी रुपये) प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी ट्रक चालकांना तासनतास वाट पाहावी लागत असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, संपूर्ण देशांतर्गत व्यापारावर याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे.

पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; शहरांत वाहनांच्या लांबच लांब रांगा

डीझेलच्या प्रचंड टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांचे हाल टोकाला पोहोचले आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंतच्या बहुतांश पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागत आहेत, तर काही चालकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांनी आपल्या पंपाबाहेर ‘नो स्टॉक’ चे फलक लावले आहेत. डीझेल मिळत नसल्याने प्रामुख्याने जड वाहने, ट्रॅक्टर आणि कमर्शियल गाड्यांच्या चालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरांतील मुख्य महामार्गांवरील पंपांवर ट्रकांच्या रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंप चालकांनी आता कॅन किंवा गॅलनमध्ये सुट्टे डिझेल देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

अस्तित्वाच्या लढाईत अडकले ट्रान्सपोर्टर्स

इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या परिवहन उद्योगाची स्थिती आता अत्यंत बिकट झाली आहे. कोणत्याही ट्रकच्या एकूण परिचालन खर्चात एकट्या डिझेलचा वाटा तब्बल ५० ते ५५ टक्के असतो. एकीकडे डिझेलची टंचाई आणि दुसरीकडे टोल टॅक्स, विमा, टायर्स, मेंटेनन्स यांसारख्या खर्चात झालेली वाढ यामुळे ट्रान्सपोर्टर्स आता अस्तित्वाची लढाई लढत आहेत. इंधन उपलब्धतेमधील हा अडथळा थेट मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल सप्लाय चेन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर गदा आणत आहे.

फक्त 2 महिनेच टिकणार अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम, JSW ग्रुपच्या चेअरमनचा मोठा दावा; नेमकं कारण काय?

अर्थव्यवस्था धोक्यात; ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची चिंता

या गंभीर परिस्थितीवर ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे (AIMTC) प्रमुख बल मलकीत सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे.

“इंधनाच्या दरात ही तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून आगामी काळात ते आणखी १५ ते २० रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने या परिस्थितीवर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून आम्ही पुढील निर्णय घेऊ शकू. या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे प्रभावित होत आहे. मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे छोट्या कारखान्यांपासून ते मोठ्या उद्योगसमूहांचे उत्पादन बंद पडण्याच्या मार्गावर आहे.” — बल मलकीत सिंह, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस

१० दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ; सीएनजीही महागला

गेल्या अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर ८७ पैसे, तर डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ९१ पैशांची वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीसोबतच सीएनजी (CNG) देखील प्रति किलो १ रुपयाने महागला आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची आणि औद्योगिक कच्च्या मालाची पुरवठा साखळी पूर्णपणे खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

Web Title: Diesel shortage and fuel price hike halts 60 lakh trucks india losses 21 billion daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • delhi
  • diesel
  • Mumbai

संबंधित बातम्या

किया सोरेंटो हायब्रिड आणि डिझेल पुढच्या आठवड्यातच होणार लाँच! जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फीचर्स
1

किया सोरेंटो हायब्रिड आणि डिझेल पुढच्या आठवड्यातच होणार लाँच! जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फीचर्स

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
2

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
3

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी
4

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.