Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा झटका, घरगुती Cylinder च्या किमती पुन्हा कडाडल्या; सरकारची नेमकी भूमिका काय?

सरकारी इंधन कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. याचा अर्थ असा की, देशभरातील सामान्य ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी पुन्हा एकदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 07, 2026 | 12:41 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

LPG Cylinder New Rate: देशातील जनतेला झटक्यांवर झटके लागतच आहेत. कधी पेट्रोल – डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ तर कधी सिलेंडरच्या किमती वाढत आहेत. यामुळे इतर गोष्टींवर पडणारा फरक वेगळाच असतो. रोजच्या जीवनातल्या वस्तूंच्या किंमती इतक्या कडाडत आहेत की सामान्यांनी जगायचं की नाही असा प्रश्न उपस्थित राहत आहे. आताही सरकारी इंधन कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. याचा अर्थ असा की, देशभरातील सामान्य ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅससाठी पुन्हा एकदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?

दरमहा अधिक खर्च

या दरवाढीनंतर दिल्लीतील प्रति सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. हे नवीन दर ७ जूनपासून लागू झाले आहेत. ही दरवाढ मागील वाढीनंतर अवघ्या तीन महिन्यांतच झाली आहे; यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. या ताज्या दरवाढीमुळे ग्राहकांना घरातील एका अत्यावश्यक वस्तूसाठी दरमहा अधिक खर्च करावा लागणार आहे.

शहरांनुसार घरगुती गॅस सिलिंडरचे नवीन दर

शहर जुनी किंमत  नवीन किंमत
दिल्ली रु. ९१३.०० रु. ९४२.००
पाटणा रु. १००२.५० रु. १०३१.५०
हैदराबाद रु. ९६७.००  रु. ९९६.००
लखनऊ रु. ९५१.०० रु. ९८०.००
कोलकाता रु. ९३९.००  रु. ९६८.००
चेन्नई रु. ९२८.५० रु. ९५७.५०
जयपूर रु. ९१६.५० रु. ९४५.५०
मुंबई रु. ९१२.५० रु. ९४१.५०
बेंगळुरू  रु. ९१५.५० बदल नाही

किंमत का वाढवण्यात आली?

मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींवर झाला आहे. इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांसारख्या सरकारी तेल कंपन्या बऱ्याच काळापासून घरगुती गॅसची विक्री उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने करत होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, ही दरवाढ त्यांच्या तोट्याची काही प्रमाणात भरपाई करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

सरकारची भूमिका काय?

सरकारची भूमिका काय?
गुरुवारी झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, एलपीजीची (LPG) पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत; यामध्ये देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे आणि आयातीची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना शर्मा म्हणाल्या, “घरगुती स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरवरील ‘अंडर-रिकव्हरी’ बाबत सांगायचे तर, ती अजूनही ७०० रुपयांच्या आसपासच आहे.”

एलपीजीच्या मागणीत अलीकडे झालेली घट आणि त्यामागील विविध कारणे शर्मा यांनी स्पष्ट केली; यामध्ये व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून होणारा कमी वापर, सुधारित बुकिंग चक्र (सायकल्स) आणि तंत्रज्ञानावर आधारित डिलिव्हरी authentication यांचा समावेश आहे. ते म्हणाले, “ही घट व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील एलपीजीचा वापर कमी झाल्यामुळे झाली आहे; दुसरे कारण म्हणजे बुकिंगच्या कालावधीचे विशेषतः २५ आणि ४५ दिवसांच्या चक्रांचे नियोजन; आणि तिसरे कारण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ द्वारे केल्या जाणाऱ्या वितरणाशी संबंधित आहे.”

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन

Web Title: Domestic lpg gas cylinder price hike by 29 rupees government stance see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Free LPG
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG price
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
2

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.