जी दुर्घटना अपेक्षित होती तीच घडत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला (Attack) केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत: या हल्ल्याला दुजोरा दिला असून, रशिया युक्रेनियन शहरांना क्रुझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करत असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, युक्रेनने या बदल्यात रशियाच्या ५ युद्धनौका पाडल्याचा दावा केला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या युद्धामुळे होणारे आर्थिक नुकसान संपूर्ण जगाचे होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) भारतीय शेअर बाजारावर जोरदार परिणाम होत आहे. गुरुवारी सेन्सेक्सने २००० हून अधिक अंकांची मजल मारली. तर निफ्टी १६५०० च्या खाली घसरला. म्हणजेच आता निफ्टी सार्वकालिक उच्चांकावरून २७०० अंकांनी घसरला आहे. दुपारी १ वाजता, सेन्सेक्स सुमारे १८०० अंकांनी ५५५०० च्या खाली गेला आणि निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी खाली १६५०० च्या आसपास व्यवहार करत आहे.
[read_also content=”प्रेयसीचे न्यूड फोटो तिच्या कुटुंबियांना पाठवणाऱ्याला जामीन नाकारला, हा तर विश्वासघात, हायकोर्टाने फटकारले https://www.navarashtra.com/india/prayagraj-crime-the-high-court-has-denied-bail-to-the-person-who-sent-nude-photos-of-his-girlfriend-to-her-family-nrvb-244494.html”]
ऑटो, आयटी आणि बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक घसरण होत आहे. HERO Motocorp चे शेअर ८ टक्क्यांहून अधिक घसरून २४५२ रुपयांवर पोहोचले. त्याचवेळी टाटा मोटर्सचा शेअरही ८ टक्क्यांनी घसरून ४३८ रुपयांवर आला आहे.
दुसरीकडे, इंडसइंड बँक (INDUSINDBK) ६ टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा ५ टक्क्यांनी घसरले. एचसीएल टेकने ४.५० टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. निफ्टी (Nifty) ५० चे ४९ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत, फक्त HINDALCO समभाग हिरव्या चिन्हात दिसत आहेत. दुसरीकडे, रशियन शेअर बाजार (Russian Stock Market Suspended) गुरुवारी स्थगित करण्यात आला आहे.
[read_also content=”दुसऱ्या मुलासोबत फोटोत पाहिली, पाच मिनिटांत केला प्रेयसीचा खून, व्हॅलेंटाईन डेच्या रात्री गळा दाबून केली प्रियकराने हत्या https://www.navarashtra.com/india/seen-in-a-photo-with-another-boy-murdered-girlfriend-in-five-minutes-strangled-by-boyfriend-on-valentines-day-night-nrvb-244468.html”]
बाजार खुल्यापूर्व सत्रातच सांगत होता की, आज जोरदार विक्री होणार आहे. प्री-ओपन सत्रात बीएसई सेन्सेक्स १,८०० अंकांपेक्षा जास्त किंवा ३.१५ टक्क्यांनी घसरला होता. NSE निफ्टी देखील ५०० पेक्षा जास्त अंकांच्या तोट्यात होता. बाजार उघडताच सेन्सेक्स १३शेहून अधिक अंकांच्या घसरणीत राहिला. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ५५,७५० अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी ३५० हून अधिक अंकांनी घसरून १६,७०० च्या खाली आला होता.
याआधी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली, मात्र संध्याकाळपर्यंत सर्व गती मंदावली होती. दिवसभराचा व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही तोट्यात होते. व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स ६८.६२ अंकांनी (०.१२ टक्के) घसरून ५७,२३२.०६ अंकांवर होता. NSE निफ्टी देखील २८.९५ अंकांच्या (०.१७ टक्के) घसरणीसह १७,०६३.२५ वर होता. अशाप्रकारे सलग सहाव्या दिवशी बाजार बंद झाला.
बुधवारी युक्रेनने आणीबाणी जाहीर केली. यानंतर अमेरिकन बाजार मोठ्या प्रमाणात तोट्यात होते. बुधवारी, डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी १.३८ टक्के, S&P ५०० १.८४ टक्के आणि Nasdaq कंपोझिट २.५७ टक्के घसरले. गुरुवारी जवळपास सर्व आशियाई बाजार तोट्यात आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे.