Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Energy Drink Label : बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार! केंद्र सरकारचे कंपन्यांना कडक निर्देश

Energy Drink Label : भारतीय FSSAI ने मद्यपेये आणि सॉफ्ट ड्रिंक्स बनवणाऱ्या कंपन्यांना एक मोठा दणका दिला आहे. बाजारात मिळणाऱ्या पेयांच्या बॉटल आणि कॅनवरून Energy Drink हा शब्द हटवण्याचे स्पष्ट निर्देश FSSAI ने दिले आहेत. या पेयांमध्ये कॅफिनचे उच्च प्रमाण असल्याने ग्राहकांची दिशाभूल टाळावी लागणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 30, 2026 | 02:56 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बॉटल-कॅनवरून ‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटणार!
  • केंद्र सरकारचे कंपन्यांना कडक निर्देश
  • यावर कंपन्यांचं नेमकं म्हणण काय?
Energy Drink Label : एनर्जी ड्रिंक शाळेच्या परिसरात विकलं जाता नये अशी बातमी मागच्या काही दिवसांमध्ये सुरु होती. आता याच एनर्जी ड्रिंकूबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAI ने उच्च-कॅफीनयुक्त उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांना ‘एनर्जी ड्रिंक‘ (Energy Drink Label)  हा शब्द न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. नियामकाच्या मते, भारतात अशा उत्पादनांना ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून पात्र ठरवण्यासाठी कोणतेही मानक नाहीत. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि सरकारने कोणते आदेश दिले आहेत. सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Swiggy Zomato Boycott : स्विगी-झोमॅटो सर्व्हिस बंद होणार? ‘या’ तारखेचा दिला अल्टीमेटम; नेमकं काय आहे प्रकरण?

FSSAI चं म्हणणं काय ?

FSSAI च्या मते, ‘शरीर आणि मनाला ऊर्जा देते’ किंवा ‘अशक्तपणा दूर करते’ यांसारखे दावे लोकांची दिशाभूल करतात आणि म्हणूनच, कंपन्यांनी असे दावे करणे टाळावे.  अनेक कंपन्या या निर्णयाचा निषेध करत आहेत आणि त्यांचा दावा आहे की याचा त्यांच्या ब्रँड आणि विक्रीवर परिणाम होणार आहे. पण FSSAI चे सीईओ रजित पुन्हानी यांनी स्पष्ट केले आहे की, कंपन्या असहमत असल्यास न्यायालयात जाऊ शकतात असं स्पष्ट केलं आहे.

कंपन्यांची अखेर सहमती

सरकारी सूत्रांनुसार, कंपन्यांनी अखेर नियमांचे पालन करण्यास सहमती दर्शवली आहे आणि FSSAI ने त्यांना लेबल बदलण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली आहे. उच्च प्रमाणात कॅफीन, साखर आणि टॉरीन असलेल्या उच्च-कॅफीनयुक्त पेयांविषयी जगभरात आरोग्याविषयी काळजी वाढत आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये पुढील वर्षी एप्रिलपासून १६ वर्षांखालील मुलांना अशा पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल. पाकिस्तानच्या काही भागांमध्ये, ही पेये उत्तेजक पेये म्हणून विकली जातात.

एनर्जी ड्रिंक कंपन्या चिंतेत, जाहिरातीवरही होईल परिणाम

एनर्जी ड्रिंक कंपन्या असा दावा करतात की, हे पेय प्यायल्याने लगेच इनर्जी मिळते. म्हणूनच त्यांच्या जाहिरातींमध्ये उत्साह आणि चपळता वाढवणारे संदेश दिलेले असतात. रेड बुलची प्रसिद्ध घोषणा आहे Gives You Feelings, तर स्टिंग ड्रिंक दावा करते की, ते पिलात तर तुमच्या शरीराला विजेच्या ऊर्जेसारखी फिलींग येतं. इंडियन बेवरेजेस असोसिएशनने म्हटले आहे की, ते सरकारी नियमांचे पालन करेल आणि विज्ञान-आधारित धोरणांना पाठिंबा देईल.

व्यवसायावर परिणाम होईल?

पण ६ जुलै रोजी FSSAI ला पाठवलेल्या एका गोपनीय पत्रात, असोसिएशनने म्हटले आहे की, प्राथमिक सूचना सार्वजनिक केल्याने कंपन्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते, व्यवसायावर परिणाम होऊ शकतो आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. असोसिएशनने असेही म्हटले आहे की, कोणतेही मोठे नियम लागू करण्यापूर्वी, सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, वाद कमी करण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कंपन्यांशी चर्चा केली पाहिजे.

Johnson Baby Powder: बेबी पावडरमुळे कॅन्सर? सर्व खटले निकाली काढण्यासाठी कंपनी देणार तब्बल इतके कोटी; घेतला मोठा निर्णय

Web Title: Energy drink label fssai energy removal deadline companies marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Business News
  • detox drinks
  • FSSAI
  • Healthy Drinks
  • Marathi News
  • summer drink

संबंधित बातम्या

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
1

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
2

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग
3

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग

Instant E-PAN Card: नवं PAN कार्ड काढायचंय? आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही!  मोबाईलवरच 10 मिनिटांत करा काम
4

Instant E-PAN Card: नवं PAN कार्ड काढायचंय? आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही! मोबाईलवरच 10 मिनिटांत करा काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.