भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे रहस्य योग्य धोरणं आहेत... लोकसंख्या नाही; 'या' अर्थतज्ञाचा दावा
सध्याच्या घडीला भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, अशातच आता सुप्रसिद्ध अर्थतज्ञ संजीव सन्याल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. केवळ भारताची लोकसंख्या अधिक असल्यामुळे भारत वेगाने प्रगती करत आहे. हे पुर्णपणे तत्थहीन आहे.
पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप
याबाबत दाखला देताना त्यांनी म्हटले आहे की, 1960-70 च्या दशकातही भारताची लोकसंख्या खूप जास्त होती. त्यावेळीही देश गरीब होता. मात्र, आता त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास फारसा झालेला नव्हता. असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ९० च्या दशकात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला होता.
हेही वाचा – आता कर्ज मिळणे झाले सोपे… यूपीआयनंतर रिझर्व्ह बॅंक कर्जदारांसाठी आणतीये ‘ही’ सुविधा!
त्या काळात देशातील अर्थव्यवस्थेने योग्य धोरणांचा अंगिकार करणे सुरु केले होते. त्यामुळे हा वेग वाढला होता. तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर, भारत त्यावेळी १० वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होता. मात्र, सध्या देशाने पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे. असेही त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेसाठी सरकारची योग्य धोरणे महत्त्वाची
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सन्याल यांनी लोकसंख्येच्या आधारावर विकास होत असल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. केवळ लोकसंख्या अधिक असून विकास होत नाही. जगात अनेक गरीब देश आहेत. परंतु त्यांची प्रगती होत नाही. देशाच्या विकासासाठी सरकारची योग्य धोरणे ही महत्त्वाची आहेत. केवळ लोकसंख्या अधिक असून, उपयोग नसतो. असेही त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.
चीनच्या आर्थिक विकासाबाबत वारंवार चर्चा होते. त्यांची अर्थव्यवस्था आता 19 ट्रिलियन डॉलर्सची आहे. तेही मोठ्या कर्जाच्या उभारणीतून इथपर्यंत पोहोचले आहेत. तर भारताने देखील याच मोठ्या कर्जाच्या उभारणीतूनच गेल्या १० वर्षात 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असेही त्यांनी शेवटी नमुद केले आहे.