इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढले (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. तर दुसरीकडे इराणकडूनही दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या हल्ल्याचा भारतावर परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. ७ मार्चपासून नवीन दर लागू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान ही वाढ करण्यात आली आहे. एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. सरकारने शुक्रवारी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही एलपीजी रिफायनरीजना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिल्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप
होळीपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅसमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. पण, आता या वाढीमुळे सर्वसामन्यांना मोठा धक्का बसला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर ११५ रुपयाने महागले
घरगुती एलपीजी व्यतिरिक्त, बाहेर जेवणे देखील महाग होऊ शकते. व्यावसायिक एलपीजी (१९ किलो सिलिंडर) ची किंमत ११५ ने वाढली आहे. दिल्लीत, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता १८८३ मध्ये उपलब्ध होईल, तर मुंबईत त्याची किंमत १८३५ पर्यंत वाढली आहे. आता हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांसाठी हे एक मोठे आव्हान आहे, कारण गॅसच्या किमतीचा थेट अन्न बिलांवर परिणाम होऊ शकतो.
घरगुती गॅस सिलेंडर पोहोचला 913 रुपयांवर
१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपयांपर्यंत वाढली आहे. नवीन दर आजपासून लागू होईल.
हेदेखील वाचा : WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी






