'या' बॅंकेचे कर्ज महागले; कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा ईएमआय; वाचा... नवीन व्याज दर!
देशातील अग्रगण्य बॅंक असलेल्या एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले. त्यामुळे आता तुम्हीही एचडीएफसी बँकेचे खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या एमसीएलआर रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आता गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच अन्य सर्व कर्जांचा ईएमआय वाढणार आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांना मोठा झटका बसणार आहे. तुमचेही एचडीएफसी बॅंकेत खाते असेल तर तुम्हांला अधिकचा ईएमआय भरावा लागणार आहे.
एमसीएलआरमध्ये पाच बेसिस पॉइंट्सने वाढ
एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर खातेधारकांना थांबावे लागणार आहे. एचडीएफसी बँकने आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ केली आहे. एचडीएफसीने वाढवलेले हे नवीन व्याज दर 7 सप्टेंबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेने या निर्णयाची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. बँकेने तीन महिन्यांसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये पाच बेसिस पॉइंट्समध्ये (0.5 टक्के) वाढ केली आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
हे देखील वाचा – मुंबई बनले सर्वात जास्त अब्धाधीशांचे शहर, चीनची राजधानी बीजिंगलाही टाकले मागे!
काय आहेत नवीन रेट
वेगवेगळ्या कर्जाच्या अवधीसाठी वेगवेगळा एमसीएलआर रेट असेल. हा एमसीएलआर रेट 9.10 टक्क्यांवरून 9.45 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ओव्हरनाईट कर्जासाठी एमसीएलआर रेट 9.10 करण्यात आला आहे. एका महिन्याच्या कर्जावर एमसीएलआर रेट 9.15 टक्के करण्यात आला आहे. तीन महीन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर दर 9.25 ते 9.30 टक्क्यांपर्यंत 5 बेसेस पॉइंट्सपर्यंत वाढवला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 9.40 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाचा MCLR दर 9.45 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षे किंवा तीन वर्षांच्या कर्जासाठी एमसीएलआर रेट 9.45 करण्यात आला आहे. एमसीएलआर दर वाढला की शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज तसेच अन्य कर्जावरील ईएमआय वाढतो.
या बॅंकानीही अलिकडेच वाढवला आपला एमसीएलआर
दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये वाढ जाहीर करून करोडो ग्राहकांना धक्का दिला होता. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एमसीएलआर 0.10 टक्के वाढवला होता. बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन दर गेल्या महिन्यात 5 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत. एसबीआयशिवाय कॅनरा बँक, युको बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची कर्जेही गेल्या महिन्यात महाग झाली आहेत.