फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यावर आपले धोरणात्मक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या एनर्जी सोल्युशन्सने केली आहे. नवीकरणीय ऊर्जा उपायांचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी कंपनीच्या “नेशन बिल्डिंग”च्या व्यापक दृष्टीकोनशी जोडलेले राहून हा व्यवसाय महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील ऊर्जा पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देईल. या राज्यांवर लक्ष केंद्रित करून, गोदरेज एंटरप्रायझेस समूह अक्षय्य ऊर्जेसाठी ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि 2030 पर्यंत 500GW नॉन-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा प्राप्त करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. पुढील 3-5 वर्षांत हा व्यवसाय 20% पेक्षा जास्त CAGR वर वाढविण्याचे लक्ष्य आहे, सौर आणि हरित ऊर्जा पायाभूत सुविधांमधील धोरणात्मक गुंतवणूक, तसेच 765kV पर्यंतच्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन प्रकल्पांच्या वाढत्या पोर्टफोलिओमुळे याला गती मिळते आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एनर्जी सोल्युशन्स व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख राघवेंद्र मिरजी म्हणाले, “जग वेगाने स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमण करत आहे. भारताची महत्त्वाकांक्षी हवामान उद्दिष्टे अभूतपूर्व बदल घडवून आणत आहेत. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये, महत्त्वाच्या राज्यांमधील पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये आमच्या धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे या चळवळीत योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही राज्ये 2030 पर्यंत 500GW नॉन-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा साध्य करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाची गुरुकिल्ली आहेत. नावीन्यपूर्ण उपाय आणि क्षमतांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा स्वातंत्र्य वाढविणे आणि भारताच्या भविष्यासाठी ऊर्जा परिदृश्याला आकार देण्यासाठी प्रमुख भूमिका बजावणे हे आमचे ध्येय आहे.”
महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने या आधीच अक्षय्य ऊर्जा उपक्रमांना मोठी चालना दिली आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने नुकताच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) सोबत भागीदारीत धुळ्यात 25 मेगावॅटचा एसी सोलर प्रकल्प सुरू केला. हा व्यवसाय महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड 765/400kV GIS पैकी एक आहे. गुजरातने 2030 पर्यंत 50% नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, GEG खावडा येथे 765kV GIS आणि 400kV GIS सबस्टेशन प्रकल्प कार्यान्वित करत आहे. मध्य प्रदेश राज्याने 2030 पर्यंत 50% वीज नवीकरणीय ऊर्जेतून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यात सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, GEG ने या आधीच मध्य प्रदेशातील एका कापड सुविधेवर 12.5MWp चा रूफटॉप सोलर प्रकल्प कार्यान्वित केला आहे, जो 1 दशलक्ष चौरस फुटांहून अधिक जागेवर पसरलेला आहे. यामुळे तो भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक तर मध्य प्रदेशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
जयपूर, राजस्थानमधील एका ऑटोमोबाइल कंपनीसाठी 5.2 MW पेक्षा जास्त रूफटॉप सौर प्रकल्प गोदरेजने यशस्वीरीत्या कार्यान्वित केले आहेत, तर गुडगाव, हरियाणातील रिअल इस्टेट कंपन्या आणि मॉल्ससाठी 2 MW पेक्षा जास्त रूफटॉप इंस्टॉलेशन्स यशस्वीरीत्या सुरू केले आहेत. याशिवाय, हरियाणा आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणी भारताच्या अक्षय्य ऊर्जा पायाभूत सुविधांना प्रगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकट करून, GW-स्केल सोलर पार्क्समधून अक्षय्य ऊर्जा स्रोतातून वीज बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रीनफील्ड 765kV AIS सबस्टेशन प्रकल्प राबवत आहे.
प्रकल्प विस्तारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचे डिझाइन आणि बांधकाम व 765kV पर्यंतचे सबस्टेशन तयार करणे समाविष्ट असेल, ज्यामुळे अक्षय्य ऊर्जेचे कार्यक्षम निर्वासन सुनिश्चित होईल. वर नमूद केलेल्या पाच राज्यांमध्ये मोठे ऊर्जा पायाभूत प्रकल्प हाती घेण्याची योजना कंपनीने आखली आहे, जे भारतातील बहुसंख्य RE प्रकल्पांमध्ये योगदान देत आहेत. GEG चे एनर्जी सोल्युशन्सचे बिझनेस युनिट केवळ सौर ऊर्जा संयंत्रांच्या स्थापनेसाठीच नव्हे, तर उच्च-व्होल्टेज सबस्टेशनच्या बांधकामासाठीही योगदान देईल, यात अधिक GW स्केल नूतनीकरणक्षम प्रकल्प बाहेर काढण्यासाठी डिझाइन केलेल्या ट्रान्समिशन क्षमतेचाही समावेश आहे.