तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे घरगुती उपाय
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीन तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेशिअल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. कायमच चेहऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेवर मोठे पिंपल्स, ऍक्ने, मुरूम इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला कायमच महागड्या स्किन ट्रीटमेंटकडे वळतात. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंट त्वचेसाठी फारश्या चांगल्या नाहीत. यामुळे उतार वयात त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींच्या त्वचेवर सुरकुत्या, ऍक्ने, ब्रेकआऊट दिसू लागतात. त्वचेचे सौंदर्य कमी झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स आणि ऍक्ने घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय कायमच त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीर आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असतात. त्यातील अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दालचिनी. दालचिनीचा वापर केल्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्वचेसाठी दालचिनी फायदेशीर आहे. सहाणेवर थोडं मध आणि दूध घालून त्यावर दालचिनी उगाळून घ्या. तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटं तसाच ठेवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स कमी होऊन जातील. पण दालचिनी प्रत्येकाला सूट होईल असे नाही. त्यामुळे दालचिनीचा वापर करताना पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे.
पित्ताच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कायमच पिंपल्स आणि बारीक बारीक मुरुमांचे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स लवकर कमी होत नाही. गुलाब आणि चंदन असलेल्या फेसवॉशने त्वचा स्वच्छ करावी. तसेच गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करावा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड, टी ट्री ऑईल किंवा मध इत्यादींचा वापर करून बनवलेले हायड्रेटींग मॉईश्चरायझर लावावे.
सुंदर दिसण्यासाठी त्वचेची बाहेरून ज्याप्रकारे काळजी घेतली जाते आतून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोजच्या आहारात नियमित मनुके, पालेभाज्या आणि तुपाचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसेच नियमित भरपूर पाणी पिऊन त्वचा हायड्रेट ठेवावी. पाण्यासोबतच विटामिन युक्त फळांच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स कमी होतील.






