सोन्याचे दर 8000 रुपयांनी कमी होणार; 'हे' आहे कारण...; वाचा... आजचे सोन्या-चांदीचे दर!
तुम्हीही लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. अशातच आता (ता.१३) तुलसी विवाह असल्याने, अनेकांची येत्या काळात लग्नासाठी लगबग सुरु आहे. अशातच आता सोन्या-चांदीच्या दरात घट होत आहे. ही घसरण आगामी काळातही कायम राहणार असून, ती 72000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकते.
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 81000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर आता आगामी काळात सोन्याच्या दरात तब्बल ८००० रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
आज (ता.१२) सराफा बाजारातील कमजोर जागतिक संकेतांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज अर्थात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १७५० रुपयांनी घसरून, ७७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जो गेल्या सत्रात तो 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 72000 रुपयांच्या आसपास खाली आला आहे. तर चांदीचा दर हा 92900 रुपये झाला आहे. सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरातही 1000 रुपयांनी झाली आहे.
देशातील विविध शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
दिल्ली – आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 77440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर तिची किंमत 91,000 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
मुंबई – आज मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 77290 रुपये आणि 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 70850 रुपये दराने उपलब्ध आहे. तर चांदीचा भाव 91,000 रुपये प्रति किलो आहे.
जयपूर – आज जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,००० रुपये इतकी आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.
कोलकाता – आज 24 कॅरेट सोने 77,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.
नोएडा – आज, नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.
लखनऊ – आज लखनऊमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 77440 रुपये आणि 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 71000 रुपये दराने उपलब्ध आहे. तर चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.
पटना – पटनामध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७७,३४० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम रुपये ७०,९०० दराने विकले जात आहे. चांदीची किंमत 91,000 रुपये प्रति किलो आहे.
चेन्नई – चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 77290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 1,00,000 रुपये प्रति किलो आहे.