Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govt Action Mode: 1ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर

आगामी सण-उत्सवांच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार १ ऑगस्टपासून मोठे पाऊल उचलणार आहे. साखर साठ्याबाबत सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 29, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 1 ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर!
  • साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय
  • व्यापाऱ्यांवर असणार कडक नजर
Govt Action Mode : १ ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर असणार आहे. केंद्र सरकारने साखर साठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साठेबाजी रोखण्यासाठी, सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी आणि वाजवी दरात साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. या उपक्रमांतर्गत, देशभरातील साखर व्यापाऱ्यांना १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत साठा मर्यादा मंजूर करण्यात आली आहे. नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे? आणि त्याचा व्यापाऱ्यांवर काय, कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊयात.

EPFO Portal: PF खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवीन ई-पोर्टल लाँच; जाणून घ्या कसा होणार फायदा

अलीकडील वाढत्या साखरेच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. त्यानुसार काही मोठे निर्णय घेण्यात आले.

सरकारचा नवा नियम काय?

या सरकारी नियमानुसार, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते किंवा मोठे मॉल्स ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करू शकणार नाहीत. याचा अर्थ असा की, व्यापाऱ्यांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत विकावी लागेल. ते यापेक्षा जास्त काळ साठा ठेवू शकणार नाहीत.
याव्यतिरिक्त, व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या साखरेचे प्रमाण दर आठवड्याला सरकारी वेबसाइटवर जाहीर करणे बंधनकारक असेल. सणासुदीच्या काळात बाजारात साखरेची कमतरता भासू नये आणि ग्राहकांना ती योग्य दरात मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी हा नियम १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत सरकारने जारी केलेल्या या नियमाचे उल्लंघन झाल्यास, अन्न विभागाचे अधिकारी गोदामावर छापा टाकू शकतात आणि 30 दिवसांपेक्षा जुना साठा जप्त करू शकतात. यामुळे, संबंधित डीलर किंवा व्यावसायिकाचा सरकारी पोर्टल (DFPD) चा व्यवसाय परवाना आणि नोंदणी रद्द केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास त्याला 3 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासासह मोठ्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
हे टाळण्यासाठी, व्यापाऱ्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी गिरण्यांमधून तेवढाच साठा उचलला पाहिजे, जो 20-25 दिवसांत बाजारात सहज विकता येईल. या नियमामागे सरकारचा एकच उद्देश आहे की व्यापाऱ्यांनी तेवढाच माल घ्यावा जो स्थानिक बाजारात सहज विकता येईल आणि तो गोदामात ठेवू नये.

Rules Change: सर्वसामान्यांना दणका? 1ऑगस्टपासून बदलणार हे नियम! LPG सिलिंडरपासून बँकिंगपर्यंत थेट खिशावर होणार परिणाम

Web Title: Govt action on sugar stock limit traders cannot hold more than 30 days stock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Action Mode
  • Business Man
  • Business News
  • Central Governement
  • Marathi News
  • Sugar
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.