आयकर भरला नाही? टेन्शन घेऊ नका... 31 डिसेंबरपर्यंत आहे मुदत, नाहीतर खावी लागेल तरुंगाची हवा
तुम्ही ३१ जुलैपर्यंत विहित मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसेल, तर अजूनही संधी गेलेली नाही. तुम्ही काही दंडासह ३१ डिसेंबरपर्यंत आपला आयटीआर दाखल करू शकतात. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकला नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष २०२३-२४ (आकलन वर्ष २०२४-२५) साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरला नसेल, तर त्वरीत फाइल करा. काही दंड भरल्यानंतर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. वास्तविक, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. मात्र, काही दंडासह 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येणार आहे. अशा विलंबाने रिटर्न भरणे याला विलंबित रिटर्न भरणे म्हणतात.
(फोटो सौजन्य – istock)
यावेळी तुम्ही रिटर्न भरण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्हाला केवळ मोठा दंडच नाही तर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. यात त्याला तुरुंगातही पाठवण्याच्या तरतुदीचा समावेश आहे. जर तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगात जाणे टाळायचे असेल तर सर्व कामे सोडून आधी रिटर्न फाइल करा.
सीएट टायर्सतर्फे मिशेलिनचा कॅम्सो या ऑफ-हायवे टायर्स ब्रँडचे संपादन!
किती दंड भरावा लागेल?
उशीरा रिटर्न भरताना, तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
1000 रुपयांपर्यंत दंड हा वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास
5000 रुपयांपर्यंत दंड हा वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास
आयकर रिटर्न भरला नाही तर काय होईल?
जर तुम्ही उशीरा रिटर्न भरला नाही तर तुमच्यावर अनेक प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यात आयकर विभाग नोटीस जारी करू शकतो. कर गणना केलेल्या मूल्याच्या 50 टक्के ते 200 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. उच्च मूल्याच्या प्रकरणांमध्ये, 7 वर्षांची कठोर शिक्षा होऊ शकते.
241.2 कोटी वार्षिक पगार; हे आहेत जगातील सर्वाधिक पगार मिळवणारे 10 एक्झिक्युटिव्ह!
आयटीआर दाखल करण्याचे प्रमुख फायदे
– कर परतावा दावा करणे सोपे आहे.
– व्हिसा मिळणे सोपे आहे.
– कर्ज घेणे सोपे आहे.
– स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे आहे
आर्थिक आणि मूल्यांकन वर्ष म्हणजे काय?
१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीला आर्थिक वर्ष म्हणतात. उदाहरणार्थ, 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीला आर्थिक वर्ष 2023-24 म्हटले जाईल. तुम्ही आता भरलेले बिल रिटर्न 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आहे.
तर मूल्यांकन वर्ष हे आर्थिक वर्षाच्या पुढचे वर्ष आहे. म्हणजे ज्या वर्षात त्या आर्थिक वर्षातील कर संबंधित बाबींचे मूल्यांकन केले जाते. उदाहरणार्थ, 2023-24 आर्थिक वर्षाचे मूल्यांकन वर्ष 2024-25 असेल.