फोटो सौजन्य- सोशल मीडिया
एचडीएफसी (HDFC Life) लाइफ या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीचा महत्वाच्या अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. अवतार आणि सेरामाऊंटकडून एचडीएफसी लाइफ बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया (बीसीडब्ल्यूआय)सह सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान महिलांसाठी सहाय्यक इकोसिस्टम निर्माण करणाऱ्या कंपन्यांना प्रशंसित करतो आणि त्यामध्ये एचडीएफसी लाइफला बीएफएसआय (Banking, Financial Services, and Insurance) क्षेत्रातील १२ कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासोबतच एचडीएफसी लाइफला मोस्ट इन्क्लुसिव्ह कंपनीज इंडेक्स (एमआयसीआय) मध्ये ‘एक्झेम्प्लर्स ऑफ इन्क्लुजन’ पुरस्कार देखील मिळाला आहे. हा पुरस्कार महिलांसह विकलांग व्यक्ती (पीडब्ल्यूडी), एलजीबीटीक्यू+ समुदाय आणि विविध पिढ्या व संस्कृतींमधील व्यक्तींसाठी सर्वसमावेशकतेला चालना देण्यामध्ये निपुण असलेल्या कंपन्यांना सन्मानित करण्यासाठी देण्यात येतो. या दोन्ही सन्मानामुळे एचडीएफसी लाईफ कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हे देखील वाचा- तुम्ही बोली लावली का? ‘हा’ आयपीओ 41.54 पट झाला सबस्क्राइब, ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती? जाणून घ्या…
एचडीएफसी लाइफचा सर्वांना समान संधी देण्यावर विश्वास
या दुहेरी सन्मानांमधून कंपनी म्हणून एचडीएफसी लाइफच्या संस्कृतीमध्ये असलेल्या डायव्हर्सिटी, इक्विटी अँड इन्क्लुजन (डीईआय)चे महत्त्व दिसून येत आहे. कंपनीचा सर्वांना समान संधी देण्यावर विश्वास ठेवते तसेच कंपनीकडून सर्वांमध्ये सतत समानतेचे वातावरण निर्माण करण्याचे आणि आव्हानांचे निराकरण करण्याचे आणि उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या प्रयत्नांमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनास्वत:ला मुक्तपणे अभिव्यक्त करण्यास, विकसित होण्यास आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये त्यांची क्षमता दाखवण्यास प्रेरणा मिळते. अशा प्रकारचे वातावरण कंपनीमध्ये विकसित केले गेले आहे.
सर्वोत्तमता, कर्मचारी सहभाग, प्रामाणिकपणा, ग्राहक केंद्रित्व व सहयोगाची आमची संस्थात्मक संस्कृती
एचडीएफसी लाइफचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर विभाश नाईक म्हणाले, ”आम्हाला दुहेरी सन्मानाचा आनंद होत आहे. या सन्मानांमधून सर्वोत्तमता, कर्मचारी सहभाग, प्रामाणिकपणा, ग्राहक केंद्रित्व व सहयोगाची आमची संस्थात्मक संस्कृती दिसून येते. आमचा विश्वास आहे की, आम्हाला घडवण्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार आहे. त्यांचा आनंद व विकास कंपनी म्हणून आमच्या प्रगतीप्रती योगदान देतात. आम्ही ग्राहकांना देणाऱ्या ऑफर्स आणि आमच्या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या पाठबळामध्ये आमचे तत्त्व ‘सर उठा के जियो’ कायम ठेवण्याप्रती कटिबद्ध आहोत.”