Bihar election results have a strong impact on the stock market! (photo-social media)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज ८ सप्टेंबर रोजी, सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक दिशेने उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९११ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६३ अंकांनी जास्त होता.
शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार नफा बुकिंग दरम्यान स्थिर राहिला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,७०० च्या वर राहिला. शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज शेअर बाजाराची सुरुवैत सकारात्मक होणार आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ७.२५ अंकांनी म्हणजेच ०.०१% ने घसरून ८०,७१०.७६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६.७० अंकांनी म्हणजेच ०.०३% ने वाढून २४,७४१.०० वर बंद झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १.१३% वाढला आणि ५ सप्टेंबर रोजी ८०,७१०.७६ वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ३९.१० अंकांनी म्हणजेच ०.०७% ने वाढून ५४,११४.५५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात वेदांत, अरबिंदो फार्मा, अदानी पॉवर, स्पाइसजेट, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल), झायडस लाईफसायन्सेस, ह्युंदाई मोटर इंडिया, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, बीपीसीएल, सनटेक रियल्टी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज, एनडीआर ऑटो कंपोनेंट्स, व्हेरॉक इंजिनिअरिंग, कॅरिसिल आणि एव्हलॉन टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आरबीएल बँक, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि एलिन इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे.
बाजार तज्ञ, चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल आणि एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी नऊ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड, सुब्रोस लिमिटेड, न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, हिंदुस्तान झिंक लिमिटेड, गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.






