फोटो सौजन्य: Pinterest
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक विश्वासार्ह आणि उत्तम मायलेज देणारी फॅमिली एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी ब्रेझा हा एक उत्तम पर्याय आहे. पण ही एसयूव्ही लोनवर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? चला याबद्दल जाणून घेऊयात.
20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच
मारुती ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.26 लाखांपासून सुरू होते आणि 13 लाखांपर्यंत जाते. ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीतील बेस मॉडेल ब्रेझ्झा LXI ची किंमत सुमारे 9.40 लाख रुपये असेल, ज्यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. मात्र, ही ऑन-रोड किंमत व्हेरिएंट आणि शहरानुसार बदलू शकते.
जर तुम्ही Maruti Brezza चा बेस मॉडेल फायनान्सवर खरेदी करत असाल आणि 1.50 लाख डाउन पेमेंट भरत असाल, तर उर्वरित रक्कम सुमारे 7.90 लाखांचा कार लोन घ्यावा लागेल. 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 9% व्याजदराने, Brezza चा मासिक EMI सुमारे 16,412 रुपये असेल. या काळात तुम्ही जवळपास 1.94 लाखांचा व्याज भराल.
एकूणच पाहता, Brezza LXI तुम्हाला अंदाजे 11 लाखांपर्यंत पडेल. मात्र, व्हेरिएंटनुसार EMI थोडी जास्त होऊ शकते.
फायनान्स तज्ज्ञांच्या मते, तुमचा EMI ही तुमच्या मासिक पगाराच्या 15–20% पेक्षा जास्त नसावे. या हिशोबाने Maruti Brezza घेण्यासाठी मासिक पगार किमान 45,000 ते 60,000 असणे आवश्यक आहे, जेणेकरून EMI आणि इतर खर्चांमध्ये योग्य संतुलन राखता येईल. एकूणच, जर तुमचा पगार 60,000 पेक्षा जास्त असेल, तर ही कार सहजपणे परवडणारी ठरते. विशेषतः CNG व्हेरिएंट निवडल्यास, कारण त्यामध्ये इंधन खर्चाची बचत होते.






